
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादक
कृत्रिम व नैसर्गिक कला आणि कौशल्याचे उत्तम गुण कुणाला कसे लाभलेले असेल हे त्यांच्या कलेवरुन व कौशल्यावरुन लक्षात येतय.
अशाच मोहक व आकर्षक प्रसंग चंद्रपूर मध्ये आलाय आणि अमय निकोडे यांचे रंगीबेरंगी आकर्षक असे रांगोळी काढणारे कौशल्य बघण्यासाठी मन प्रसन्न चित्ताने ओढवले गेले.
चंद्रपूर येथे फेरफटका मारताना अमय निकोडे हे युवक एका दुकानापुढे रांगोळी काढताना दिसले व तिथेच काही क्षण पाय स्थिरावले.
झटपट रांगोळी काढताना काही क्षणातच त्यांनी आकर्षक अशी रंगीबेरंगी रांगोळी काढली आणि सदर दुकानाला रांगोळीने सुशोभित केले.
अमय निकोडे यांची रांगोळी काढण्याची कार्यपद्धत अक्षरशः स्थिरवनारी अशीच होती.क्षणाचाही विलंब न करता त्यांनी झटपट काढलेली आकर्षक रांगोळी कौतुकास्पद आणि कौशल्याचे सर्वज्ञ सादर करणारी होती.
अमय निकोडे हे महाराष्ट्र राज्यातंर्गत चंद्रपूर मनपा शहरातील लालपेठ येथील रहिवासी आहेत.