भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
मुरूम गाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाने 31 ऑक्टोबर 2005 पासून बंद केलेल्या एन.पी. एस .पेन्शन योजनेचा काळ्या फीती लावून आज 31 ऑक्टोबर 2023 ला निषेध करण्यात आला.
शासनाने 18 वर्षापूर्वी बंद केलेली जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करावी व नवीन एन पी एस पेन्शन योजना बंद करावी असे आवाहन केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी राहुल बनसोड ,आरोग्य सहाय्यक अजय नवघरे ,औषध निर्माता अधिकारी विवेक मून, आरोग्य सेविका आसमवार, बर्डे, ठेसरकर ,ठवरे, राठोड. आरोग्य सेवक विक्रम दडमल, संजय न्यालेवार ,प्रांजल शेडमाके, शुभम उईके , संतदास नैताम, संजय आत्राम ,मडावी. टेक्निशियन प्रशांत गोतमारे, परिचर मंगल सिंग देहारी, दीपक रगडे आदींनी काळ्या फिती लावून नवीन एन पी एस पेन्शन योजनेचा निषेध केला आहे.