जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक जान्सन यांची मुरमाडी शाळेला भेट…

 

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि 

     सिंदेवाही 

        चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जान्सन यांनी मुरमाडी शाळेला नुकतीच भेट दिली. 

         भेटीत अंगणवाडी विद्यार्थ्यांची पाहणी केली,शाळेतील परसबागेचे निरीक्षण करून समाधान व्यक्त केले.

             मुरमाडी शाळेत नियमित सुरू असलेल्या नवोदय अभ्यास वर्गाला भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला,सर्व विद्यार्थ्याना शुभेच्छा देत शाळेला प्रस्तावित ओपन सायन्स पार्कचे काम त्‍वरित सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.

            शाळेच्या भौतिक सुविधांचा आढावा घेत आवश्यक स्वच्छतागृहाची मागणी मान्य करून शाळेच्या समोरील भागात पेवर ब्लॉक लावण्याच्या सूचना दिल्या.

              सीईओ यांच्या भेटीच्या वेळी सिंदेवाही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अक्षय सुक्रे, गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे, मुरमाडी सरपंच रुपाली रत्नावार, उपसरपंच निलकंठ जांभूळे, शाळेचे मुख्याध्यापक रमेश मेश्राम, ग्रामसेवक घरड़े, शाळेचे शिक्षक प्रकाश बन्सोड, सोनाली ज्ञानवल, अंगणवाडी सेविका उषा मोहुर्ले तसेच पंचायत समिति अंतर्गत विविध विभागाचे प्रमुख ऊपस्तिथ होते.