धानोरा /भाविक करमनकर
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुंनघाटे महाविद्यालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच समान संधी केंद्राच्या वतीने साजरी करण्यात आली याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून डॉ. टेंभुर्णे ग्रामीण रुग्णालय धानोरा व लेनगुरे ग्रा.रुग्णालय धानोरा हे या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित होते मान्यवराच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी मंचावरून बोलत असताना डॉक्टर टेंभुर्णे मार्गदर्शनात म्हणाले डॉ, बाबासाहेब आंबेडकर हे थोर प्रतिभावान विचारवंत, कायदेपंडित, समाज सुधारक, एक पत्रकार, प्रसिद्ध अर्थतज्ञ अशी ख्याती प्राप्त करणारे महापुरुष होते त्यांनी सामाजिक न्यायाचे प्रस्थापना व्हावे याकरिता मोठे योगदान भारतीय समाज व्यवस्थेमध्ये दिले आहे त्यांच्या द्वारा लिखित आर्थिक सिद्धांत आणि त्यांनी लिहिलेले अर्थशास्त्राचे प्रबंध यांचा आधार आजही जागतिक स्तरावरचे अर्थतज्ञ घेत असतात त्यांनी विदेशात जाऊन परिस्थिती नसताना सुद्धा उच्च शिक्षण घेतले आणि त्या उच्च शिक्षणाचा फायदा भारतीयांना करून दिला. जगात सर्वश्रेष्ठ असे संविधान लिहिले आणि विविधतेने नटलेल्या भारतास एकसूत्रतेत बांधण्याचे कार्य संविधानातून केले दिले .सर्वांना समान संधी सर्वतोपरी संविधानामध्ये निर्माण केली .या संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण समाजामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक समानतेच्या अधिकारावर न्याय प्रस्थापित झाला पाहिजे आणि या अधिकारांचा उपभोग सर्वांना घेता आला पाहिजे अशी तरतूद भारतीय संविधानामध्ये त्यांनी करून ठेवली. भारतीय संविधान आज जगप्रसिद्ध संविधान यामुळेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायद्याचा ज्ञान तेथें अंतर्भूत केले आहे.. यावरून असे लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता ही समाजाकरता अत्यंत महत्त्वाची होती त्यांनी दिलेले योगदान संपूर्ण विश्वात सर्व स्तरावर मौल्यवान ठरलेआहे म्हणूनच केवळ भारतातच नाही तर जगातील प्रत्येक राष्ट्रांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते आणि म्हणूनच त्यांना संपूर्ण विश्वात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखले जाते. असे महामानव या भारत भूमीत जन्मले त्यांचे भारतीय समाजावरती आणि संपूर्ण मानवी समुदाय वरती परोपकार आहेत त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी जो मार्ग दाखविलेला आहे त्या मार्गावरती मार्गक्रमन केले पाहिजे तरच सर्वांची उन्नती आहे असे बहुमूल्य विचार डॉक्टर टेंभुर्णी यांनी याप्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.गीताचंद्र भैसारे यांनी केले याप्रसंगी प्रा.भाविकदास करमनकर भास्कर वाढनकर तसेच शिक्षक व प्रशासकीय वृंद उपस्थित होते.