युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील शेंडगाव येथील ३५ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने झाडा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना(२८) ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
शरद विनायक येवले(३५) रा शेंडगाव असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून आज(२८)सकाळच्या सुमारास निंभारी रोडवरील वनीकरणाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविली.
मृतकाकडे दोन एकर शेती असून तो अविवाहित होता एक भाऊ आहेत दरवर्षीची होत असलेली सततची नापिकी व डोक्यावरील कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून आत्महत्या केली मृतकाच्या मागे मोठा भाऊ, आई व बहीण असा परिवार असून गावात गरीब स्वभावचा म्हणून त्याची ओळख होती.
घटनेची माहीती खल्लार पोलिसांना मिळताच घटनास्थळी ठाणेदार चंद्रकला मेसरे, परेश श्रीराव, विजय निमकांडे, गोपाल सोळंके यांनी धाव घेत मृतकाचा व घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला शवविच्छेनानंतर मृतकावर शेंडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.