अमान क़ुरैशी
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर..
सिंदेवाही
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कॉंग्रेसचे पक्ष निरीक्षक श्री. दिलीप पणकुले यांनी सिंदेवाही तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत विविध विषयातंर्गत आज आढावा घेतला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी विभागाची बैठक सार्वजानिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह यांचे संपन्न झाली.बैठकीचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.दिलीप पणकुले होते तर बैठकीच्या अध्यक्ष स्थानी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य होते.
यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. आनंद अडबाले,युवक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सूरज ठाकरे,जिल्हा चिटणीस मनोज कुमार सैनी,जिल्हा चटणीस भगवान पगाडे,जेष्ट नेते तुळशीदास खोब्रागडे यांची उपस्थिती बैठकीला होती.
तालुक्यातील तालुका,शहर,विधानसभा महिला अध्यक्ष उपस्थित होते.
श्री.दिलीप पणकुले आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रवादी ही संकल्पना प्रत्येक गावात (घरोघरी) हा कार्यक्रम राबवणे यावर मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार व त्यांनी केलेल्या लोकहितार्थ सर्व कार्याची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचे आहे असे संगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य यांनी अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,मोदी व फडणवीस सरकारने,”खोटे बोल पण रेटून बोल,यानुसार जनतेची फसवणूक केली आहे.बेरोगारी,महागाई,लूट कशी होत आहे,यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच युवा कार्याध्यक्ष संजय ठाकूर,डॉ.अडबले सर,जेष्ठ नेते खोब्रागडे सर यांनी आपले विचार माडले.
बैठकी प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष इब्राहीम (बबलू) शेख,शहर अध्यक्ष वसंत कुळमेथे,तालुका युवाध्यक्ष अनंत,तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष मूजीभूल्ला शेख ,बाबोंडे,युवा शहर अध्यक्ष निकलेश गुरनुले,महिला शहर अध्यक्ष जानवी बोडगुलवार,छाया प्यारमवार,कल्पना मरसकोल्हे,अरूंना दागमवार,शेषराव चौके,प्रशांत चामलवार,चरणदास नैतांम,प्रकाश बोरकर,विकास चाहांदे,लालभाऊ,परसराम गोरर्लावार,देविदास नागपूरे,चंदू सोयम,नरेश ठोंगे,मूप्पावार सर,देवेंद्र खोब्रागडे,नंदू प्यारमवार,बंडू वरवाडे,अक्षय बुरबांदे,विजय जामूळे,विनोद कामडी,यांच्यासह मोठ्या संखेने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष इब्राहीम (बबलू) शेख यांनी केले.