दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेत्र आळंदी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात येत असून आज दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास महाद्वार चौकात कॅन्डल मार्च काढण्यात आला, तसेच आम्हाला आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारने केवळ तारखा दिल्या आहेत. पण निर्णय काही घेतले नाही. त्यामुळे आम्ही आता मागे हटणार नसल्याची भूमिका यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने समन्वयकांनी मांडली आहे.
यावेळी डि.डि.भोसले पाटील, आनंदराव मुंगसे, सचिन गिलबिले, राहुल चव्हाण, दिनेश घुले, शशी राजे जाधव, अरुण कुरे, अर्जून मेदनकर, महादेव पाखरे, सचिन शिंदे, रामदास दाभाडे, ज्ञानेश्वर गुळुंजकर, अजित मधवे, ज्ञानेश्वर घुंडरे, भागवत शेजूळ, श्रीकांत बोरावके तसेच वारकरी संप्रदायातील विद्यार्थी, महाराज मंडळी व महीला वर्ग बहूसंख्येने उपस्थित होते. यावेळी आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, रमेश पाटील, मच्छिंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.