दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज पासून आळंदी आणि परीसरातील गाव यांच्या वतीने महाद्वार चौकात साखळी उपोषणास सुरुवात केलेली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी म्हणून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आळंदी सर्कलमधील सर्व मराठा समाज बांधवांनी आजपासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर, माजी नगरसेवक डि.डि.भोसले पा., रमेश गोगावले, आनंदराव मुंगसे, दिलीप कुऱ्हाडे, विलास कुऱ्हाडे, शिवसेना नेते उत्तम गोगावले, अजित वडगावकर, शशीराजे जाधव, अरुण कुरे, अर्जून मेदनकर, ज्ञानेश्वर गुळुंजकर, धनंजय ठाकूर, किरण नरके, श्रीकांत काकडे, रामदास दाभाडे तसेच अनेक मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.यावेळी आळंदी पोलिस स्टेशन मार्फत चोख बंदोबस्त ठेवला आहे.
जोपर्यंत सरकारकडून ठोस लेखी आश्वासन मिळत नाही आरक्षणाचा जीआर मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहील हे साखळी उपोषण सरकारला शांततेच्या मार्गाने ना झेपणार ना पेलणार अशा स्वरूपाचे असणार आहे. मनोज जरंगे यांनी सरकारला ३० दिवस दिले होते पुन्हा १० दहा दिवस दिले तरी पण सरकारकडून आरक्षणाच्या संदर्भात कुठलीच हालचाल दिसून आली नाही चाळीस दिवसात सरकारने कुठलाच निर्णय न घेतल्याने पुन्हा मनोज जरंगे यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. सर्व मराठा समाज जरंगे पाटील यांच्या सोबत आहे हे साखळी उपोषणाच्या माध्यमातून आळंदी सर्कल मधील सर्व गावांच्या वतीने हे उपोषण सुरू झाले.
उपोषणा तत्पूर्वी आळंदी नगरपरिषद व पोलीस निरीक्षक आळंदी यांना रीतसर निवेदन देऊन उपोषणाला सुरुवात झाली आहे. हे उपोषण आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातील महाद्वार चौकात सुरू आहे.