धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्यस्तरीय कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन व चर्चासत्राचे आयोजन… 

प्रितम जनबंधु

  संपादक 

              23 ऑक्टोंबर 2023 रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कृषी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्यस्तरीय कृषी तंत्रज्ञान प्रदर्शन व चर्चासत्र या प्रदर्शनामध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नागपूर, यांचेमार्फत माहिती शिक्षण संवाद उपक्रम सन 2023- 24 अटल भूजल योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीकरता सहभाग घेण्यात आला.

          सदर प्रदर्शनामध्ये अटल भूजल योजनेची प्रमुख उद्दिष्टे, कार्यपद्धती, जलसुरक्षा आराखडा तयार करणे, जलसुरक्षा आराखड्याची अंमलबजावणी, भूजलाच्या व्यवस्थापनासाठी दरवर्षी करावयाचे कामे, भूजलाचे व्यवस्थापनासाठी गावांमध्ये कोणकोणत्या उपाय योजना राबवता येतील तसेच त्रयस्थ मूल्यमापन याबाबत माहिती प्रदर्शित करण्यात आली तसेच सदर प्रदर्शनामध्ये शेतीसाठी पाणी बचतीच्या विविध उपाय योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.   

                    जलसंवर्धनाकरिता विविध उपाय, छतावरील पाऊस पाणी संकलन, या विषयाची माहिती प्रदर्शित करण्यात आली.

         यावेळी योजनेच्या स्टॉलला माननीय सौ मुक्ताताई कोकरडे अध्यक्ष जी. प. नागपूर, श्री प्रवीणजी जोध सभापती प. नागपूर, श्री रवींद्र मनोहरे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, डॉ. वर्षा माने वरिष्ठ भूवैज्ञानिक, श्री राजेश गावंडे कनिष्ठ भूवैज्ञानिक, श्री नंदकिशोर बोरकर कनिष्ठ भूवैज्ञानिक, श्री नंदकिशोर काळबांडे तांत्रिक अधिकारी, श्री तुमपल्लीवार अभियंता, श्री निलेश खंडारे माहिती शिक्षण संवाद तज्ञ उपस्थित होते.