अखेर “त्या” अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटली…. — मृत्युचे कारण मात्र गुलदस्त्यातच….

प्रितम जनबंधु

    संपादक 

      आरमोरी:- तालुका मुख्यालयापासून अगदीच २ किमी अंतरावर ब्रह्मपुरी रोड नजीक असलेल्या जीवानी राईस मिलच्या मागे एका अनोळखी इसमाचा मृतदेह २२ ऑक्टोंबर रोजी आढळून आला होता. सदर इसमाची ओळख पटली नसल्याने सदर व्यक्तीचे शव ग्रामीण रुग्णालय आरमोरी येथे ठेवण्यात आले होते. व सदर व्यक्तीची ओळख पळविण्यासाठी पोलीस स्टेशन आरमोरी यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी केले होते.

             त्या अनोळखी इसमाची ओळख पटली असून विलास नामदेव मेश्राम (अंदाजे वय ४५ ) राहणार रणमोचण, तालुका ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपुर असे त्या इसमाचे नाव असल्याचे सिद्ध झाले आहे. 

               सदर मृतक व्यक्ती हा आपली उपजीविका भागविण्यासाठी डेकोरेशनच्या कामावर जात असल्याचे सांगण्यात आले आहे. विलास हा १९ ऑक्टोबर रोजी कामाला जात आहे असे सांगून घरातुन गेला होता व तो आरमोरी येथील नातेवाईक यांच्याकडे आला असल्याचे कळले.  

        दरम्यान २२ ऑक्टोबर रोजी तो जीवानी राईस मिल च्या मागे मृतावस्थेत आढळून आला. काही वेळ ओळख पटली नव्हती मात्र याबाबत नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी ओळख पटवून मृतक विलास शवविच्छेदन करण्यात आले व आज ४ वाजता विलास याच्या कुटुंबियांकडे मृतदेह सुपुर्द करण्यात आले असल्याचे समजते. 

        सदर मय्यत इसमाचा मृत्यु कशाने झाला असावा, याचे कारण मात्र कळु शकले नसल्याने मृत्युचे नेमके कारण मात्र अजुनही गुलदस्त्यातच आहे. पोलीस स्टेशन आरमोरीच्या मार्फतिने पुढील तपासत्र सुरु आहे.