बावडा ते नरसिंहपुर परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येक गाव व सर्व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरी…

 

निरा नरसिंहपुर दिनांक: 14

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

बावडा ते नरसिंहपुर या परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 या कार्यक्रमा प्रसंगी सर्वप्रथम महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 व त्यानंतर पिंपरी बुद्रुक ग्रामस्थांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.  

सर्व बौद्ध समाज, गायकवाड व पाटील सहित सर्व समाज बांधव यांच्या वतीने जयंती उत्सव साजरी करण्यात आलली.

पिंपरी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आजी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.

 याप्रसंगी ध्वजारोहणा नंतर सामूहिक बुद्ध वंदना नानासाहेब गायकवाड यांनी केली. या कार्यक्रमा प्रसंगी गावातील प्रत्येक समाजातील महिला, पुरुष, तरुण, युवक, युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

नरसिंहपूर, गिरवी, टणु, पिंपरी बुद्रुक, ओझरे, गणेशवाडी, बावडा, सराटी, गोंदी, लुमेवाडी,लिंबुडी, या सर्व भागांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन सहकार्य करून कार्यक्रमाला शोभा आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप ठोकळे यांनी केले तर आभार प्रदर्शन आण्‍णासो पाटील यांनी मानले .