कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
कन्हान : – मुलनिवासी सम्राट राजा रावण यांचे दहन करणे ही कुप्रथा असुन या कुप्रथेला आदिवासी समाजा तिव्र विरोध आहे.यामुळे रावण दहन कुप्रथा शासन प्रशाशनाच्या प्रभावाने बंद करण्यात यावी,अशा आसयाची मागणी कन्हान पोस्टेचे वरिष्ट पोलिस निरिक्षक सार्थक नेहेते ह्याना गोंडवाना गणतंत्र पार्टी कन्हान पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली आहे.
दरवर्षी आदिवासी समाज बांधव सम्राट राजा रावणाची पूजा अर्चना करित रावणाचा सम्मान दिवस साजरा करित असतानाच,रावन दहनाची कुप्रथा भारत देशाच्या काही भागात सुरु असल्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात.
सम्राट राजा रावण दहन करण्याची कुप्रथा पुर्णपणे बंद करावी.यासाठी शासन प्रशासनाने रावण दहण करणा-यावर सक्त कार्यवाही करावी.अशा प्रकारची मागणी बऱ्याच वर्षापासुन विविध राज्यातील आदिवासी समाज बांधवांन कडून लेखी निवेदनाद्वारे केली जात आहे.मात्र आदिवासी समाजातील नागरिकांच्या भावनांकडे शासन-प्रशासन दुर्लक्ष करतो आहे याचे शल्य आदिवासी बांधवाना आहे.
देशातील काही राज्यात रावण दहनाची प्रथा बंद आहे.पण काही ठिकाणी आजही ही कुप्रथा चालुच आहे,ही प्रथा बंद व्हावी म्हणुन आदिवासी समाज बांधव सतत निवेदन व पत्र व्यवहार करित आहेत.
याच अनुसंगाने एक निवेदन कन्हान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते ह्याना गोंडवाना गणतंत्र पार्टी कन्हानच्या शिष्टमंडळाने दिले व मुलनिवासी आदिवासी समाजाचा सम्राट राजा रावण यांचे दस-याच्या दिवसी रावण दहन करणे ही विडंबना असुन या कुप्रथेवर कायदेशीर अंकुश लावावा व आदिवासी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आदिवासी समाजाच्या वतीने गोंडवाना गणतंत्र पार्टी कन्हान शहर द्वारा करण्यात आली आहे.
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष तिरू शिवेन्द्र (सोनुृ) मसराम, तिरू सुखलाल मडावी,तिरू रामलाल पट्टा,तिरू बंडु इडपाची,तिरू राजेश टेकाम,तिरू नरेंद्र कोराम,तिरू अनिल पंधराम सह बहुसंख्य आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.