युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
खल्लार नजिकच्या गौरखेडा येथील राशन दुकानास गावातील पूर्ण कार्ड जोडण्यात यावे अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात आली आहे.
गौरखेडा येथील तत्कालीन राशन दुकानदार सज्जन खंडारे यांच्या निधनानंतर गावातील १५२ कार्ड हे दुसऱ्या राशन दुकानाशी जोडण्यात आले होते.त्यामुळे गावातील राशन कार्ड धारक हे दुसऱ्या गावातील राशन दुकानावरून राशन आणत होते.
सज्जन खंडारे यांच्या पत्नी छायाताई खंडारे यांच्या नावावर आता राशन दुकान झाले असून त्यांच्याकडे ४७ कार्ड धारक जोडण्यात आले असून उर्वरित कार्ड धारक हे दुसऱ्या दुकानाशी जोडले आहेत.दर्यापूर तहसील कार्यालयातील अन्नपुरवठा विभागाचा मनभिन्नतेचा व कार्यभिन्नतेचा असला प्रकार काहीसा अजब दिसतो आहे.
गावातील पूर्ण कार्ड धारक हे गौरखेडा येथील राशन दुकानाशी जोडण्यात यावे असा ठराव ग्रा.पंचायतच्या मासिक सभेत दि.२७ सप्टेंबर रोजी घेण्यात आला होता.
त्यानुसार गौरखेडा मधील सर्व कार्ड धारक हे गावातील राशन दुकानाशी जोडण्यात यावे अशी मागणी संबंधित दर्यापूर तहसीलदार यांना करण्यात आली आहे.