सुधाकर दुधे
सावली प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या सावली तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना सावली तालुक्याचे अशासकीय समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते,बोथली येथील माजी सरपंच प्रकाश पा. गड्डमवार यांची निवड करण्यात आली त्याची प्रथम बैठक आज सावली तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.
या बैठीकाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील गड्डमवार होते.यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे स्वागत केले व संजय गांधी,श्रावण बाळ,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेची माहिती तपशीलवार माहिती सादर केली.त्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 20 लाभार्थी, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना चे 19 लाभार्थी ,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना चे 26 लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना 17 लाभार्थी व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना चे 2 असे एकूण 86 पैकी 84 लाभार्थी यांना पात्र करण्यात आले.
यावेळी समितीचे सदस्य,सावली तालुका महामंत्री तथा भाजपा नगरसेवक सतीश बोम्मावार, भाजपा सावली शहराध्यक्ष आशीष कार्लेकर, गेवरा खुर्द येथील उपसरपंच डॉ.गंगाधरजी धारने,व्याहड खुर्द येथील माजी उपसरपंच सौ. शोभाताई बाबनवाडे ,लोंढोली येथील कोंडय्या बोदलकर ,व्याहाड बुज येथील पतरुजी गेडाम,भाजप महामंत्री तथा पाथरी चे माजी सरपंच दिलीप ठिकरे ,सावली नप चे नगरसेविका सौ. शारदाताई गुरनुले,उसेगाव येथील माजी उपसरपंच अरून पाल यांची तसेच तहसीलदार, नायब तहसीलदार चांदेकर, गटविकास अधिकारी तेलकापल्लीवार हे उपस्थित होते.