विवेक रामटेके
बल्लारपूर तालुका ग्रामीण
कोठारी – बेरोजगारी ही देशातील सर्वात मोठी समस्या असून त्याचे समाधान व्हावे व देशातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी शासन सतत प्रयत्नरत व कार्यरत असते.शहरांप्रमाणे ग्रामीण भागाचा सुद्धा विकास व्हावा,ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासन सतत प्रयत्नशील असते.
त्यासाठी शासन अनेक उपक्रम राबवत असते.याकरिता ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी नुकताच नवीन उपक्रम शासन राबवत आहे. त्या अनुषंगाने ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम कोठारी येथील महात्मा फुले – डॉ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे दि.१९ ऑक्टोंबर रोजी पार पडला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले.
सदर कार्यक्रमात ना. अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,ना.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,ना.एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री- महाराष्ट्र राज्य,ना.मंगल प्रभात लोढा मंत्री – कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता,हे उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांनी ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ या योजनेचा लाभ घ्यावा व त्या माध्यमातून उत्कृष्ट कौशल्य अंगीकृत करून स्वयंरोजगार करावा.
यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत बेरोजगार युवकांसाठी करेल,असे नरेंद्रजी मोदी यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी चंदनसिंग चंदेल माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य,हरीशजी शर्मा भाजपा जिल्हाध्यक्ष,रामजी लखिया संघटन महामंत्री चंद्रपूर,सोमेश्वरभाऊ पद्मगिरीवार माजी उपसभापती पंचायत समिती बल्लारपूर,सौ.अश्विनी वासमवार सरपंच ग्रामपंचायत कोठारी,सुनीलभाऊ फरकडे उपसरपंच ग्रामपंचायत कोठारी व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर,किशोर कोटरंगे सदस्य ग्रामपंचायत कोठारी,प्रशांत पोटदुखे,चंद्रकांत राजुरकर,अजय मेश्राम,सौ. कोमलताई लाटेलवार,सौ. अनिताताई खोब्रागडे,कविताताई वासमवार,सौ.जयश्री भोयर,सौ. स्वाती कोडापे,सौ.शीला देवाडकर इ. सदस्य- ग्रामपंचायत कोठारी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन त्रिनेत्र पदुम कृषी व शिक्षण बहुउद्देशीय संस्था भंडारा यांनी केले असून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मृत्युंजय मंडल – टी.सी. त्रिनेत्र पदुम कृषी व शिक्षण बहुउद्देशीय संस्था,रमेश शील तसेच व्ही. यु. लेडांगे गटनिर्देशक औद्योगिक प्रशिक्षण संस्था बल्लारपूर,रवी ढोके निर्देशक औद्योगिक प्रशिक्षण संस्था बल्लारपूर,सौ.कडस्कर मॅडम औद्योगिक प्रशिक्षण संस्था बल्लारपूर यांनी अथक परिश्रम घेतले.
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात ग्रामपंचायत कोठारीचे समस्त पदाधिकारी,ग्रामस्थ,अंगणवाडी सेविका व कार्यकर्ता,आशा वर्कर,जनता विद्यालय कोठारीचे शिक्षक तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती.