नवजीवन सीबीएसई च्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड…

 

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

         साकोली:क्रिडा व युवक सेवा संचालनायक महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रिडा अधिकारी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरिय शालेय फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये 14 वर्षे वयोगटातील नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्राय. स्कुल (सी.बी.एस.ई.) साकोली च्या विद्यार्थांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

            उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या आदित्य गोसावी,जयश मडावी, नैतीक लांजेवार, आराध्य खंडारे, चिन्मय रामटेके, चेतन लंजे, पियुष खुजे, प्रतिक लंजे, प्रिन्य मौर्या, योगांत भेंडारकर, रूजल वासनिक, विक्रम चौधरी, सुयश सराटे, सोहम नाकाडे, वेदान्त राठोड या युवक विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक ब्रह्मानंद करंजेकर, संस्थाध्यक्ष सोमदत्त करंजेकर, शाळेचे प्राचार्य मुझम्मील सय्यद, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान, सतीश गोटेफोडे, क्रीडा प्रशिक्षक अशोक कुमार मीना, श्रीधर खराबे, पार्वती मीना, शालेय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विध्यार्थ्यांचे अभिनंदन करून विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.