ईटगाव येथील मोफत महाशिबिरात ३०० रुग्णाची तपासणी.. — मोफत औषध वितरित केले.

 

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- तालुक्यातील इटगाव ग्राम पंचायत कार्यालयात शालिनीताई मेघे हॉस्पिटल रिचार्ज सेंटर आणी ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र कोराडी याचे तर्फे मोफत महा आरोग्य शिबीर घेण्यात आले होते.

         महा आरोग्य शिबीर कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल भाऊ काळे सरपंच ग्राम पंचायत इटगाव हे होते.तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे अँड पंकज क्षीरसागर जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी आघाडी भाजपा नागपूर हे होते.,

      याचबरोबर बोढारे सर, ग्रामपंचायत इटगावचे ग्रामसेवक श्री.बोढारे यांचे उपस्थितीत महाशिबीरचे विधिवत उदघाटन करून शालिनीताई मेघे हॉस्पिटल रिचार्ज सेंटर प्रमुख व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र कोराडीचे डॉक्टर कामरान शेख,डॉक्टर प्रदीप जोशी,डॉक्टर वैशाली खंडाईत,डॉक्टर गिरीश जयस्वाल,डॉक्टर शुभांगी मॅडम, यानी विविध आजारग्रस्त रुग्णानांची तपासनी केली व तिनशे रुग्णांना औषध दिली.उपयुक्त माहीती संबंधित डॉक्टरांनी रुग्णाना दिली.

         गावातील महा आरोग्य शिबिराला यशस्वी करण्याकरिता राहुल,दिपाली,रुपेश इंगोले,शैलेश मोहनकर,देवयानी क्षीरसागर,आचल गोठवाड, व ग्रामपंचायत सदस्य,गवातील महिला बचत गट,अंगणवाडी सेविका,मदतनिस व आशावर्कर सह इतर गावातील नागरिकानी सहकार्य केले.