
चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:-
येथील कृष्णमूरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे शालेय गणेशोत्सवामध्ये अनेक पर्यावरणस्नेही गणेश मूर्ती बनवा स्पर्धेसोबत अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच वन्यजीव सप्ताह निमित्ताने दुर्मिळ गिधाड चित्रकला स्पर्धांचे सुद्धा आयोजन करण्यात आले.याचबरोबर वन्यजीवसप्ताह 1 ते 7 ऑक्टोबर निमित्ताने व राष्ट्रीय स्वच्छता अभियान पंधरवाडा निमित्ताने शालेय परिसरात स्वच्छता अभियान नेचर क्लब तसेच शाळेतील स्काऊट व गाइडच्या सदस्य विद्यार्थ्यांद्वारे करण्यात आले.
सर्वप्रथम संस्थेच्या अध्यक्षा विद्या कटकवार व संस्थासचिव शिल्पा नशिने,प्राचार्य व्ही एम देवगिरकर यांनी सर्वच स्पर्धकाचे अभिनंदन केले.त्यानंतर सर्वच पर्यावरणस्नेही स्पर्धेविषयी मार्गदर्शन ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने,प्रा. जागेश्वर तिडके यांनी केले.
इकोफ्रेंडली गणेश मुर्ती बनवा स्पर्धेत हायस्कुल गटात रुणाली निंबेकरला प्रथम क्रमांक ,पूर्वा बहेकारला द्वितीय क्रमांक तर रोहिणी भैसारेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.मिडलस्कुल गटात जान्हवी धकातेला प्रथम क्रमांक तर अथर्व बहेकारला द्वितीय क्रमांक देण्यात आला.सर्वच स्पर्धकांनी पर्यावरण देखावा करून मूर्ती सजावट केली.
गणेश मूर्ती बनवा स्पर्धांचे परीक्षण पुष्पा बोरकर,अनुराधा रणदिवे यांनी केले.याचसोबत रांगोळी स्पर्धा,नृत्य स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा,मोदक बनवा स्पर्धा, गणेश चित्रकला स्पर्धांचे सुद्धा हायस्कुल मिडलस्कुल विभागातर्फे करण्यात आले.
वन्यजीवसप्ताह (1 ते 7 ऑक्टोबर )निमित्ताने दुर्मिळ गिधाड चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे परीक्षण सुद्धा पुष्पा बोरकर व अनुराधा रणदिवे यांनी केले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक वैभवी कटनकर, गुंजन घरत यांना तर द्वितीय क्रमांक मनस्वी राऊत,दुर्वांशा चव्हाण,कोमल भांडारकर यांना तर तृतीय क्रमांक वृषाली चुटे,जान्हवी शेंडे, जान्हवी मेश्राम यांना तर प्रोत्साहनपर क्रमांक दिव्यांशी टेम्भुरकर हिला देण्यात आला.
यानंतर शालेय परिसरात साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात,संस्थाअध्यक्ष विद्या कटकवार यांचे हस्ते वृक्षारोपण वन्यजीव सप्ताह (1 ते 7 ऑक्टोबर) तसेच स्वच्छता पंधरवाडा निमित्ताने करण्यात आले. तसेच शालेय परिसर स्वच्छता अभियान सुद्धा कनिष्ठ महाविद्यालयीन कला शाखेच्या सर्वच विद्यार्थीद्वारा तसेच स्काऊट गाईडच्या विद्यार्थी तसेच अनुराधा रणदिवे व डी. बी. उईके या शिक्षकांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक प्रा.के टी.कापगते, प्रा.डी एस. लांजेवार, प्रा.प्रशांत शिवणकर, प्रा.व्ही डी हातझाडे,प्रा.राजेश भालेराव, प्रा.जागेश्वर तिडके,प्रा.शीतल साहू,प्रा संजय पारधी,प्रा के पी बिसेन हे उपस्थित होते.