चिमूरात संविधानाच्या रक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर! -ईव्हीएम हटाव,संविधान बचाव,यासह विविध मागण्यांचे निवेदन सादर… — ईव्हीएम मशीनची केली होळी..

रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

             चिमूर:-  देशातील अनुसूचित जाती,जमाती,इतर मागासवर्गीय समाजाच्या नागरिकांचे अधिकार व राजकिय,सामाजिक आरक्षण तथा लोकशाही,संपवण्याचा घाट रचून शेटजी भटजींचे राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपा सरकार कडून सुरू असून राज्यात बहुजन समाज असुरक्षित झाला आहे.

           जातींच्या,धर्माचा नावावर बहुजन समाज घटकातील नागरिकांना आपापसात लढवल्या जात आहे.त्यामुळे बहुजन समाजाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली आणि,”ईव्हीएम हटाव,संविधान बचाव,या प्रमुख मागणीसाठी आक्रोश मोर्चा अंतर्गत शासनाचा निषेध करण्यात आला.

          शहरातील संविधान चौकातून भदंत ज्ञानज्योति महाथेरो यांच्या मार्गदर्शनात,भदंत धम्मचेती,प्रदेश सदस्य कुशलभाऊ मेश्राम,माजी राज्यमंत्री तथा वंचितचे प्रमुख विदर्भ समन्वयक डॉ.रमेशकुमार गजभे,विदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर,जिल्हा प्रभारी राजेश बोरकर,जिल्हा प्रभारी कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे,महिला जिल्हाध्यक्षा कविता गौरकर,बाळासाहेब बन्सोड,युवा जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे यांच्या मोर्चा काढण्यात आला.

              देशातील सर्वच निवडणूका बॉलेट पेपर वर घेण्यात याव्यात,अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना मालकी हक्क पट्टे देण्यासाठी तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी,केजी टू पीजी शिक्षण मोफत करण्यात यावे,६२ हजार शाळेचे खाजगीकरण रद्द करावे,सर्व जातीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे,कंत्राटी भरतीचा जिआर रद्द करण्यात यावा,अश्या अनेक मागण्या मोर्चा द्वारे करण्यात आल्यात.

          सरकारच्या विरोधात घोषणा देत मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येत धडकला.

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले.

            दरम्यान मोर्चेकऱ्यांना भदंत महाथेरो ज्ञानज्योति,उमरेड विधानसभा समनव्यक राजू मेश्राम,बाळासाहेब बन्सोड,कुशलभाऊ मेश्राम,डॉ रमेशकुमार गजभे,शुभम मंडपे, अरविंद सांदेकर,अल्काताई मोटघरे,आदींनी मोर्चाला संबोधित केले.

              संचालन प्रकाश मेश्राम यांनी केले.दरम्यान शिस्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल रमेश बैस यांना पाठविण्यात आले.

         मोर्चाच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

***

ईव्हीएम मशीनची केली होळी…

        “ईव्हीएम मशीन हटाव,देश बचाव….” ईव्हीएम मशीन हटाव,संविधान बचाव…”ईव्हीएम मशीन हटाव,देशातील नागरिक बचाव…असे गगनभेदी स्लोगण म्हणत मोर्चेकरांनी ईव्हीएम मशीनची होळी केली.

           मोर्चाची मुख्य मागणी एव्हीएम हटाव,देश बचाव ही असल्याने,मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालया पुढे प्रतिकात्मक एव्हीएमची होळी करून ईव्हीएम हटवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

       ईव्हीएम मशीन द्वारा होणाऱ्या निवडणुका भयमुक्त,पारदर्शक व खात्रीशीर नसल्याने निवडणूकांच्या माध्यमातून भ्रष्ट मार्गाने लोकप्रतिनिधी निवडून आणल्या जातात असा नागरिकांचा आरोप आहे.