युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर तालुक्यातील खल्लार नजिकच्या महिमापूर येथील ऐतिहासिक म्हणून प्रसिध्द असलेली पाय-यांची विहीर आता डाक विभागाच्या पोस्ट कार्डवर झळकणार आहे.
खल्लारते आसेगाव रोडवर महिमापूर हे गाव विहिरीचे म्हणून प्रसिध्द आहे.ही विहीर पाय-यांची असून हजारो वर्षांपूर्वी ही ऐतिहासिक विहीर बांधण्यात आली आहे.
पुरातन काळातील स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना ही विहीर पाहिल्यावर पर्यटकांच्या नजरेस पडतो.नुकतेच राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्य महाराष्ट्रातील आठ हेरिटेज स्टेपवेल पोस्ट कार्ड व माहिती पुस्तकाचा लोकार्पण सोहळा पोस्ट मास्टर जनरल के के शर्मा व महाराष्ट्र सर्कल पोस्ट मास्तर अभिताभ सिंग यांच्या हस्ते पार पडला.
पाय-यांची विहीर,सातवाहन,राष्ट्रकूट,चालुक्य यादव,शिवकालीन व नंतर विविध कालखंडातील राज्यकर्त्यानी पायऱ्याच्या विहीरी बांधलेल्या आहेत.त्यात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातंर्गत खल्लार नजिकच्या महिमापूर येथील ऐतिहासिक पुरातन विहिरीचा समावेश आहे.लोकार्पण झालेल्या पोस्ट कार्डवर या ऐतिहासिक विहीरीचा फोटो देण्यात आला आहे.
त्यामुळे या विहिरींची माहीती जिल्ह्यातील व इतर राज्यातील नागरिकांपर्यंत सहज पोहचणार आहे.