युवराज डोंगरे
अमरावती(जिल्हा प्रतिनिधी)
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा अमरावती चे जिल्हा अधिवेशन दिनांक १६ एप्रिल ला संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृह, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (वि. म. वि.) अमरावती येथे पार पडणार आहे.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही अमरावती जिल्ह्यातील एक मोठी संघटना आहे. या संघटनेचे राज्यात मोठे जाळे असून ती राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर काम करणारी एकमेव संघटना आहे. संघटनेच्या अधिवेशनाकरिता अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष आदरणीय देवीदासजी बस्वदे हे या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून खासदार नवनीत रवी राणा ह्या आहेत. विशेष अतिथी म्हणून आमदार यशोमती ताई ठाकूर, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बच्चू भाऊ कडू, आमदार रविभाऊ राणा, आमदार बळवंत भाऊ वानखडे, आमदार प्रतापदादा अडसळ, आमदार देवेंद्र भुयार, आमदार किरण सरनाईक, आमदार धीरज लिंगाडे, अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख माजी अध्यक्ष जिल्हा परिषद अमरावती, रवींद्र ठाकरे आदिवासी आयुक्त महाराष्ट्र शासन, विशाल पंडा मुख्य कार्यकारी अधिकारी जि प अमरावती, प्रियाताई देशमुख शिक्षणाधिकारी प्राथमिक, श्री कल्याण लवांडे राज्य सरचिटणीस अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमातील जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे पदाधिकारी पंडितराव देशमुख, किरण पाटील, राजाभाऊ होले, नीलकंठ यावले, सुनिता पाटील, ज्योती उभाड, मनोज चौरपगार, संजय नागे, आदींनी केले आहे असे प्रसिध्दी प्रमुख सुरज मंडे यांनी कळविले आहे.