रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर:-
तालुक्यातील माकोना येथे अचानक मीराबाई मेश्राम यांच्या घराला आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यानआग लागली असून या आगीत मीराबाई मेश्राम यांच्या घरातील संपूर्ण महत्त्वाचे जिवनावश्यक साहित्य जळून खाक झाले.
घराला आग लागलेला व्हिडिओ
घराला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले असून शासनाने व स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ मदत करावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
आगीचे कारण अद्यापही समोर आले नसून बघ्यांची गर्दी जमलेली आहे.