
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
बसपा सुप्रिमो बहन मायावती यांचा राजस्थान दौरा जाहीर झाला असून नोव्हेंबर महिण्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूक सभातंर्गत उपस्थित लाखो मतदारांना,पक्ष पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांना त्या संबोधणार आहेत.
१७ ते १९ नोव्हेंबर पर्यंत त्या आठ सभांना संबोधणार आहेत.त्यांचा निवडणूक प्रचार दौरा निश्चित झाला असून सभा स्थळ निश्चित होणे बाकी आहे.
राजस्थान येथील बसपा राज्य प्रभारी,प्रदेशाध्यक्ष व पदाधिकारी सभा यशस्वी करण्यासंबंधाने जोमाने कामाला लागले आहेत.
राजस्थान येथील नागरिक,मतदार हे बसपा विचारधारेला मानणारे असून राजस्थान मधील अनेक क्षेत्रात बसपाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे.