
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
ईव्हीएम मशीन द्वारा होणारी निवडणूक प्रक्रिया ही शंकाजन व गैरविश्वासू असल्याने,ईव्हीएम मशीन द्वारा पुढील लोकसभा व विधानसभा घेण्यात येवू नये या मुख्य मागणीसह शेतकऱ्यांच्या,श्रमीक कामगारांच्या,बेरोजगारांच्या,तमाम नागरिकांच्या हितासाठी,” वंचित बहुजन आघाडी तर्फे चिमूरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर येत्या १८ आक्टोंबरला आक्रोश मोर्चा धडकणार आहे.
येत्या १८ आक्टोंबरला होणाऱ्या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व जगप्रसिद्ध भदंत महाथेरो ज्ञानज्योती,भदंत धम्मचेती,वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य कुशल मेश्राम,विदर्भाचे प्रमुख समन्वयक व माजी राज्यमंत्री डॉक्टर रमेश कुमार गजबे,विदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर,चंद्रपूर जिल्हा प्रभारी राजेश बोरकर,चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे,जिल्हा सल्लागार निलकंठ शेंडे,विनोद देठे,जिल्हा उपाध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे आणि वंचित बहुजन आघाडीचे इतर सर्व चंद्रपूर जिल्हा पदाधिकारी व चिमूर तालुका पदाधिकारी करणार आहेत.
जन आक्रोश मोर्चा संविधान चौक पोलिस स्टेशन चिमूर पासून निघणार आहे व उपजिल्हाधिकारी कार्यालय चिमूर येथे नियोजित कार्यक्रमाच्या रुपरेषा समाप्ती नंतर सदर मोर्चाचे समारोप होणार आहे.
***
ईव्हीएम मशीन हॅकिंग एक गंभीर प्रकार….
एकीकडे, “ईव्हीएम मशीन द्वारा होणारी निवडणूक प्रक्रिया ही या देशातील बहुजन समाज घटकांसाठी महा संकटे निर्माण करणारी ठरली आहे तर दुसरीकडे,”भांडवलदारांचे व ब्राह्मणवाद्यांचे हित जपण्यासाठी वरदान ठरली आहे.
निवडणूक काळात ईव्हीएम मशीनचा हत्यारा सारखा उपयोग सत्ताधाऱ्यांकडून केल्या जात असल्याचे पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर केल्या गेली आहेत.मात्र सर्वोच्च न्यायालय ईव्हीएम मशीन हॅकिंग बाबत केव्हा सुनावणी करते कळायला मार्ग नाही.
लोकशाहीत,देशातील नागरिकांना अनन्य साधारण महत्व असताना ईव्हीएम मशीन हॅकिंग बाबत सर्वोच्च न्यायालय संवेदनशील व गंभीर का म्हणून होत नाही हा प्रश्न देशातील नागरिकांना पडला आहे.
ईव्हीएम मशीन द्वारा होणारी निवडणूक प्रक्रिया भितीमुक्त,विश्वासपुर्वक,पारदर्शक नाही.कारण मतदान केल्यावर ते मत आपण दिलेल्या उमेदवारालाच दिल्या गेले आहे याची खात्री मतदारांना होत नाही.
मतदान करताना ईव्हीएम मशीनची बटन दाबल्यावर लाईट लागणे व उमेदवाराचे चिन्ह दिसने एवढे पुरेशे नाही.तर मतदान केल्यावर ज्या उमेदवाराला मतदार मतदान करतो आहे त्या चिन्हाची चिठ्ठी त्याला बाहेर व आत जमा होताना स्पष्ट खात्री झाली पाहिजे आणि सर्व मतदान चिठ्यांची मतगणनना झाली पाहिजे.तरच ईव्हीएम मशीन द्वारा होणारी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आहे असे मानता येईल.अन्यथा ईव्हीएम मशीन द्वारा होणारी निवडणूक घोटाळेबाज आहे असे गृहीत धरण्यास हरकत नसावी.
तद्वतच ईव्हीएम मशीन द्वारा होणारी निवडणूक प्रक्रिया ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार धारेच्या पक्षांना मारक ठरत आहे व त्या पक्षांना शक्तीहिन करत आहे..
यामुळे भारत देशात ईव्हीएम मशीन द्वारा होणारी निवडणूक प्रक्रिया बंद होणे आवश्यक आहे व ती काळाची गरज आहे.
***
वंचितच्या महत्वपूर्ण मागण्या…
१) भारतीय निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेण्यात यावी.
२) तिन पिढ्यांची अट रद्द करुन सर्व अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना तात्काळ मालकी हक्क पट्टे देण्यात यावी.
३) के.जी. ते पि.जी शिक्षण मोफत करण्यात यावे.
४) ६४ हजार शासकीय शाळांचे खाजगीकरण रद्द करावे.
५) सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
६) ६ सप्टेंबर २०२३ चा कंत्राटीकरणाचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा..
७) जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे खाजगीकरण बंद करावे.
८) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर कराव्यात..
९) शासकीय,निमशासकीय व खाजगी आस्थापनेतील नियमित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी..
१०) शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव द्यावा…
११) गोसीखुर्द सागराचे पाणी शेतकऱ्यांना बारमाही उपलब्ध करून द्यावे..
१२) दुष्काळग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करुन देण्यात यावी..
१३) गोंडवाना विद्यापीठात बोगस झालेली प्राध्यापक भरती तात्काळ रद्द करावी..
१४) चिमूर तालुक्यात अपात्र केलेल्या घरकुल धारकांची यादी तात्काळ सार्वजनिक करावी.
१५) शेतकऱ्यांच्या कापसाला १५ हजार रुपये हमी भाव देण्यात यावा..
१६) चिमूर तालुक्यातील पांदन रस्ते लवकरात लवकर मंजूर करावेत..
१७) शेतकऱ्यांचे सर्व कर्ज सरसकट माफ करावे…
१८) धान उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपये क्विंटल प्रमाणे हमीभाव देण्यात यावे..
१९) शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा…
२०) संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनातंर्गत थकीत हप्ते त्वरित देण्यात यावे…
वरील सर्व प्रकारच्या मागण्या शासकीय व प्रशासकीय स्तरावर वंचित बहुजन आघाडी रेटून धरणार आहे…
***
मोर्चाची जयत तयारी…
वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने चिमूर येथे होणारा आक्रोश मोर्चा यशस्वी करण्यासंबंधाने मोर्चेबांधणी सुरु झाली असून मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे.
गाव तेथून १०० नागरिक,महिला भगिंनी स्ववाहनाने व स्वखर्चाने मोर्चात सहभागी व्हावे असे नियोजन बहुजन वंचित आघाडी तर्फे करण्यात आले आहे.
***
संघर्ष…
शोषण,अन्याय व अत्याचारा विरोधात संघर्ष केल्याशिवाय पदरात यश पाडता येत नाही आणि आत्मसन्मान कायम राखता येत नाही.जो समाज स्वहितासाठी आणि स्वकल्याणासाठी सातत्याने कायदेशीर संघर्ष करीत नाही त्या समाजाला त्याचे हक्क मिळवून घेता येत नाही.
म्हणूनच आंदोलन व कायदेशीर मार्गाने संघर्ष करणे आवश्यक झाले आहे.