
अश्विन बोदेले
तालुका प्रतनिधी
दखल न्यूज भारत
आरमोरी : आरमोरी तालुका मुख्यालया अंतर्गत येत असलेल्या वडधा येथील तलाठी कार्यालय गेल्या दोन-तीन महिन्यांपासून प्रभारी तलाठ्याच्या भरवशावर चालविला जात आहे.
प्रभारी तलाठ्यांकडे दोन साजाचा प्रभार असल्यामुळे नागरिकांचे कामे वेळेवर होत नाही. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व कामे खोडंबल्यामुळे मनस्ताप होत आहे.
वडधा तलाठी कार्यालया अंतर्गत वडधा, टेंभाचक ,डार्लि, बोरी, खैरी, चिंचोली, चिंचोली चक असे एकूण सात गावांचा समावेश आहे. काही गावातील नागरिकांना दहा किलोमीटरचे अंतर ओलांडून वडधा येथे यावे लागते. परंतु इथे येऊनही काम न झाल्यामुळे आल्या पावली परत जावे लागते.
त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन या ठिकाणी तलाठींची नियुक्ती करावी. अशी परिसरातील जनतेची मागणी होत आहे.