
शहर प्रतिनिधी
चिमूर:-
आज दिनांक १५ आँक्टोबरला डाँ ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन ” म्हणून साजरा करण्यात आला.
भारताचे माजी राष्ट्रपती,व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त समाजसेवा सार्वजनिक वाचनालय मालेवाडा येथे ग्रंथ वाचन कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मालेवाडाचे अध्यक्ष जगदीश रामटेके होते.त्यानी डॉ.अब्दुल कलामांचे बालपणात पेपर टाकणारा एक शालेय विद्यार्थी ते शास्त्रज्ञ,राष्ट्रपती असा जीवन प्रवास सांगितला.
या पासून विद्यार्थ्यांनी बोध घेवून,जीवनात पुढे जावे असे अध्यक्ष स्थानावरून रामटेके बोलत होते.
यावेळी ग्रंथालयाचे सभासद आशिष रामटेके,प्रमोद वरखडे,सामाजिक कार्यकर्ता राकेश मेश्राम,योगेश मेश्राम, गंगाधर गजभिये,वंदना मेश्राम,शकुंतला मेश्राम,भिमाबाई गजभिये,काजल ठवरे,दीक्षा गजभिये,लिलाबाई बोरकर, भावना शेंडे,सुनंदा रामटेके, समाजसेवा सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल रामदास ठुसे आदी उपस्थित होते.