कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान : – अनैतिक संबंधाच्या संशयातुन होमगार्ड आशिष पाटील या युवकाची आरोपींनी हॉकी स्टिकने प्रहार व धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या केली होती.
चारचाकी वाहनात मृत्यूदेह टाकुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मध्य प्रदेशातील कटंगी ता. तिरोडी पोस्टे अंतर्गत फेकुन चारचाकी वाहन सोडुन हत्यारे फरार झाले होते.
फरार तिन्ही आरोपीना स्थागुशानाग्रा पथक व कन्हान पोलीसानी,”अरोली येथील रेणुका बार मध्ये दारू पित असताना पकडले.पोलीसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीचा सहा दिवसाचा पीसीआर दिला आहे.
होमगार्ड आशिष उर्फ सोनु दिलीप पाटील वय २७ वर्ष राह. न्यु गोंडेगाव पुनर्वसन वसाहत असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असुन मुख्य आरोपींची नावे कुणाल राजेश नाईक वय ३१ वर्ष व साथीदार सुमित नागोराव गजभिये वय ३५ वर्ष आणि आशिष उर्फ डांगा महेश नागदेवे वय २९ वर्ष सर्व राह. न्यु गोंडेगाव पुनर्वसन अशी आहेत.
हत्येचा थरारक घटनाक्रम मंगळवार (दि.१०) ऑक्टोंबरचा आहे.दुपारी कन्हान हद्दीत नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गवर बोरडा चौरस्ता जवळील बसस्टापवर हत्येची घटना घडली.घटनेचा पर्दाफाश होताच चांगलीच खळबळ उडाली.
आरोपी कुणाल नाईक व मृतक मौजा न्य गोंडेगाव येथे जवळपास राहत असुन मृतक आशिष हा पारशिवनी येथुन होमगार्डची रात्रपाळी ड्युटी करून सकाळी घरी परत आल्यावर कृणाल नाईकने आशिषला नागपुर जबलपुर चारपदरी महामार्ग क्र. ४४ वरील बोरडा चौरस्ता बस स्टॉपवर बोलावुन घेतले.
यावेळी शाब्दिक वाद झाला आणि काही कळण्यापुर्वीच आरोपींनी हॉकी स्टिकने प्रहार व धारदार शस्त्राने वार करून आशिषची हत्या केली.
त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे उदेशाने चारचाकी वाहना द्वारे मध्यप्रदेशातील तह. कटंगी जि. बालाघाट तिरोडी पोलीस स्टेशन हद्दीत कार क्र. एमएच ३१ सीएन ६२४० रस्त्यात दोन्ही चाके पंचर झाल्याने तेथेच जमिनीवर मुतदेह टाकला.
घटने बाबत तेथील पोलिसांना माहिती होताच रक्ताने माखलेले चारचाकी वाहन सोडुन आरोपी हत्यारे पसार झाले.
मुतदेह कन्हान पोस्टे अंतर्गत असल्याने कन्हान पोलीसाना तेथील पोलीस यंत्रणा कडून माहिती दिल्याने कन्हान पोलीस पथक व नातेवाईक घटनास्थळी पोहचले व मृत्य देहाची ओळख केली.
यानंतर कन्हान पोलिस व स्थागुशा नागपुर ग्रामिण पथक रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन पाहीले असता हत्या करणाऱ्या आरोपींची सर्व माहिती घेतली.
आरोपी हत्यारे यांचा पोलीस शोध घेत असताना गुरूवार (दि.१२) ला तिन्ही आरोपीना स्थागुशानाग्रा पथक व कन्हान पोलीसानी,”अरोली येथील रेणुका बार मधून आरोपींना ताब्यात घेतले.
मध्यप्रदेश येथील तिरोडी पोलीसानी घटनेचा गुन्हा नोंद करून शुक्रवार (दि.१३) ला हत्येच प्रकरण कन्हान पोलीसाच्या स्वाधिन केल्याने कन्हान पोलीसांनी तिन्ही आरोपीना न्यायालयात हजर केले.हत्येचा पुढील सखोल तपासा करिता न्यायालयाने तिन्ही आरोपीचा सहा दिवसाचा म्हणजे (दि.१८) ऑक्टोंबर पर्यंत पीसीआर दिला आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण हर्ष ए. पोद्दार,अपर पोलीस अधिक्षक डॉ.संदीप पखाले,उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा ना. ग्रा. पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे,कन्हान पोलीस वरिष्ट निरिक्षक सार्थक नेहेते,सपोनि सी.बी.चव्हाण,एएसआय खुशाल रामटेके,जयलाल सहारे,मुद्दसर जमाल,अमोल नागरे,अश्विन गजभिये,हरिष सोनभद्रे,नविन पाटील सह,स्थागुशा नागपुर ग्रामिण पथक पोउप निरिक्षक बट्टूलाल पांडे,एएसआय नाना राऊत,हेकॉ विनोद काळे,गजु चौधरी,ईकबाल शेख,अरविंद भगत,प्रमोद भोयर,संजय बरोदीया,नापोशि विरु नरड,राकेश तालेवार,चालक मोनु शुक्ला आदीनी शिताफितीने तपास करून आरोपींना पकडले.
घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.