जिल्हा प्रतिनिधि
अमान क़ुरैशी
दखल न्यूज़ भारत
सिदेवाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसील कार्यालय सिदेवाही येथे विविध समस्या बाबत तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाकडून श्रावणबाळ,उपकाळ,संजयगांधी निराधार,अपंग लाभार्थी यांना दरमहा अनुदान देण्यात येते. तो अनुदान वेळेवर न मिळता अनुदानाला दोन ते तीन महिने कधी तर चार महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
त्यामुळे लाभार्थ्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे.त्यांच्यासमोर उपजीविकेचे संकट उभे असून केंद्र व राज्य शासनाने लाभार्थ्यांचे बँक खात्यात दरमहा अनुदान पाठवावे। तसेच राज्य शासनाने 6 सप्टेंबर 2023 रोजी बाह्य यंत्रणे कडून सार्वजनिक पद भरती व सरकारी आणि नगरपरिषदेचे 62 आजार शाळा बंद करून खाजगी 9 कंपन्यांना हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला असून तो निर्णय राज्य शासनाने रद्द करावा तसेच वीजदर इंधन दर गगनाला भीड़ले असून सर्वसामान्य जनतेच्या जीव जगणे कठीण झाले आहे.
तरी शासनाने वीजदर इंधन दर कमी करावे.औरंगाबाद मध्ये मृत्यू पावलेल्या रुग्णांची पृणावृत्ती होऊ नये याचे शासनाने गंभीर दखल घेऊन प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात मुबलक औषधी साठा व सोय उपलब्ध करून द्यावे.
असे अनेक मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष इब्राहिम बबलू शेख, ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष प्रफुल महाजन,शहर अध्यक्ष वसंत कुलमेते,जिल्हा सचिव भगवान पगाडे, युवा अध्यक्ष अनंत बांबोडे, युवा शहर अध्यक्ष निखिलेश गुरनूले,महा सचिव प्रशांत चामलवार,महिला शहर अध्यक्ष जानवी बोंडगुलवार, कल्पना मरसकोल्हे,रामदास सरवरे,संजय आत्राम,विनोद कांबळी तसेच बहुसंख्य न राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.