निरा नरसिंहपुर दिनांक :11
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी संतोष हारीभाऊ सुतार यांची बिनविरोध निवड झाली.
निवडी प्रसंगी ऊप सरपंच संतोष सुतार बोलत आसताना म्हणाले की पिंपरी गावचा सरपंच म्हणून माझ्या कुटुंबाला कैलासवासी बाबुराव सुतार व कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदा संधी मिळाली याचा मला आज आनंद आहे.माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे व माजी सरपंच श्रीकांत बोडके व गावातील माझे तरुण मित्र यांच्या मार्गदर्शनाने पिंपरी बुद्रुक गावचा विकास इथुन पुढे जोमाने करू व गोर गरिबांचे प्रश्न मार्गी लाऊ उपसरपंच संतोष सुतार यांचे निवडी प्रसंगी उद्गार .
पिंपरी बुद्रुक गावच्या ऊप सरपंच पदावर संतोष हारीभाऊ सुतार यांनी पदभार घेतला.
पिंपरी बुद्रुक येथील ऊप सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक झाली. त्या ठिकाणी ऊप सरपंच म्हणून संतोष सुतार यांची बिनविरोधी निवड झाली.
ऊप सरपंच पांडुरंग बोडके यांनी आपल्या ऊप सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर ग्रामपंचायत सदस्याच्या उपस्थितीत ऊप सरपंच म्हणून संतोष सुतार यांची बिन विरोध निवड झाली.,, विद्यमान सरपंच भाग्यश्री सुदर्शन बोडके यांच्या अध्यक्षते खाली ही निवडणूक घेण्यात आली.
सदर निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक जी.ए.लंबाते यांनी पाहिले या निवडणुकी साठी माजी सरपंच ज्योती श्रीकांत बोडके, माजी ऊप उपसरपंच पांडुरंग बोडके, ग्रामपंचायत सदस्य आनुराधा गायकवाड, सुनिता शेंडगे, ग्रामसेवक गणेश लंबाते , या सर्वांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पाडण्यात आली.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच श्रीकांत बोडके ,वर्धमान बोडके , भागवत सुतार ,नामदेव बोडके , सरपंच प्रतिनिधी सुदर्शन बोडके , सतीश बोडके ,मारुती सुतार , पोपट बोडके , आबासो बोडके , राजेंद्र सुतार ,संजय सुतार ,बाबासो गायकवाड ,नंदू सुतार ,चक्रधर सूर्यवंशी ,सतीश सूर्यवंशी,शंकर रणदिवे, मयूर सुतार, पपु पडळकर आधी ग्रामस्थ व गावातील आजी-माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऊप सरपंच पदाच्या निवडणुकी नंतर ऊप सरपंच पदी संतोष सुतार, यांची बिनविरोध निवड झाल्यावर यांचा सन्मान नामदेव बोडके यांच्या हस्ते करण्यात आला तर माजी उपसरपंच पांडुरंग बोडके यांचा सन्मान भागवत सुतार यांच्या हस्ते करण्यात आला.