22 म्हैस जनावरे कत्तलीकरिता नेताना पोलीसानी आयसर वाहन पकडले..  — दोन आरोपी अटक, एक फरार, १३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त….

 

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा टोल नाका जवळ कन्हान पोलीसांनी नाकाबंदी करुन आयसर वाहनाला पकडुन २२ म्हैस जनावरांना जीवदान देऊन दोन आरोपी ला अटक करित एकुण १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोस्टे ला तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून एका आरोपींचा शोध सुरु केला आहे. 

          प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.०८) ऑक्टों बर ला मध्यरात्री ००.१० वाजता नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरिल बोरडा टोल नाका जवळ कन्हान पोलीसांनी नाकाबंदी केली असता आरोपीतांनी आपले मालकाचे सांगणेवरून संगणमत करून आयसर वाहनात म्हैस जनावरांची अवैद्यरित्या वाहतु क करताना पहाटे सकाळी ५.४४ वा. मिळुन आल्याने आयसर वाहन क्र.एमएच- ४०- सीडी १८९३ मध्ये १) १० नर म्हैस जातीचे जनावरे प्रत्येकी किंमत १५००० रू प्रमाणे १,५०,००० रुपये, २) १२ मादाम्हैस जनावरे प्रत्येकी कीमत १५,००० रू.प्रमाणे १,८०,००० रूपये असा एकुण ३,३०,००० रूपये चे म्हैस जनावरे व आय शर वाहनाची किमत अंदाजे १०,००,००० रू असा एकुण १३,३०,००० रू चा मुद्देमाल असे एकुण म्हैस २२ जनावरे आखुड दोराने निदर्यतेने बांधुन कोंबलेले अवस्थेत अवैधरित्या वाहतुक करून जनावरे कत्तल खान्यात कत्तलीकरिता घेवुन जात असल्याचे प्राथमि क चौकशीत निष्पन्न झाल्याने आरोपी आरोपी १) साकीर खान नजीम खान वय २६ वर्ष रा. जनमखारी पोस्ट धोवीस ता. बरघाट जि. सिवनी (म.प्र.), २) तुलसिदास तुलाराम भलावी वय ३४ वर्ष रा. भिसापुर पोस्ट चंद्रपुर ता. कुरई जि सिवनी (म.प्र.) फरार आरो पी ३) जिया खान रा. कामठी जि नागपुर च्या ताब्या तील मुद्देमाल पोलीस पथकाने पंचनामा करून वरील प्रमाणे माल पंचासमक्ष जप्त केला व जप्ती पंचनाम्या प्रमाणे कारवाई करित जप्त २२ म्हैस जनावरांची चारा पाण्याची व्यवस्था करणेकरिता गोवंश ध्यान फाउंडेश न खरबी नागपुर येथे जमा केले व पोच पावती प्राप्त केली.

       पोलीस पथकाने सरकार तर्फे फिर्यादी आशिक शामदास कुंभरे पोस्टे कन्हानचे लेखी तक्रारी वरून अप क्र. ६४८/२३ कलम ११ (१),(ए),(डी),(ई),(एफ), (आय), प्रा.ल.प्र. अधि सह कलम ५ (अ)(ब) म.प. अधि. मपोका १०९, ३४ भादंवी अन्वये तीन्ही आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करून तपासात घेतला. ही कारवाई पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण व अपर पोलीस अधिक्षक साहेब ना ग्रा, उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी विभाग कन्हान, वरिष्ठ पो लीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचे मार्गदर्शनात पोहवा उमाशकर पटेल, नापोशि आशिक कुभरे यानी केली असुन गुन्हयाचा तपास सफौ गणेश पाल व पोहवा सचिन वेळेकर हे करित आहे.