रश्मी शुक्ला राज्याच्या महापोलीस संचालक होणार? — चर्चांना फुटले पेव… — असे झाले तर विरोधी पक्षनेते काय करणार?

 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

        वृत्त संपादीका 

             राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे वरीष्ठ आयपीएस अधिकारी आहेत.ते येत्या डिसेंबर महिण्यात सेवानिवृत्त होणार आहेत व यानंतर त्यांची नियुक्ती एमपीएससीच्या अध्यक्षपदी होणार आहे. 

          मात्र,रश्मी शुक्ला ह्या वादग्रस्त आयपीएस अधिकारी असून २०२४ ला जून महिण्यात त्या निवृत होत आहेत.ज्या आयपीएस अधिकाऱ्यांचा सेवा निवृत्ती कालावधी कमी आहे अशा अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक पदावर बढती देता येत नाही असे कायदेशीर प्रक्रिया सांगते आहे.

          असे असले तरी २०२४ ला लोकसभा व विधानसभा निवडणूका बघता महाराष्ट्र सरकार त्यांची बेकायदेशीर नियुक्ती करु शकते अशा आशयाचे वृत्त दैनिक सामना मध्ये ४ आक्टोंबरला प्रकाशित झाले आहे.

           रश्मी शुक्ला यांची जर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर नियुक्ती केली तर त्या वेळेस विरोधी पक्षनेते यांच्या भुमिका व कर्तव्य काय असणार?हे महाराष्ट्र राज्यातील जनता बघेल.

           याचबरोबर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करुन महाराष्ट्र सरकार चूक करीत असेल तर विरोधी पक्षनेते चूप बसून त्यांच्या चूकीच्या निर्णयाला समर्थ देणार काय?हे परिस्थिती सांगेल…