
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे विभागीय
आळंदी : “आजादी – सुवर्ण इतिहास स्त्री क्रांतीचा” हा स्वातंत्र्य लढयातील स्त्री वीरांगनांचे योगदान तसेच त्यांचा जीवनपट उलगडनारा ग्रंथ रोमांचित करणारा आहे. भारतीय स्वातंत्र्यात स्त्रियांचे उल्लेखनीय योगदान आहे. प्रत्येक स्त्रीने दिलेला लढा आणि इंग्रजाविरुद्ध कामगिरी ही प्रेरणादायी आहे आणि त्यांचे इतिहासाच्या पानात महत्व पुसता येणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आळंदी येथे बोलताना व्यक्त केले.
युवा लेखिका प्रियंका रामराव चौधरी लिखित “आजादी – सुवर्ण इतिहास स्त्री क्रांतीचा” दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खा.श्रीनिवास पाटील, खा.डाॅ.अमोल कोल्हे, मा.आ.विलास लांडे, सुर्यकांत पलांडे, दिनकर शास्त्री भुकेले, केशव महाराज उखळीकर, विकास लवांडे, श्यामसुदंर महाराज सोन्नर, सत्यपाल महाराज, राजाभाऊ चोपदार, बबनराव कुऱ्हाडे, गोविंद महाराज गोरे तसेच वारकरी संप्रदायातील मान्यवर मंडळी उपस्थित सोहळा पार पडला.
प्रियंका चौधरी यांनी बेधडक , प्रेरणादायी, हिमतीने कामगिरी करणाऱ्या स्त्रियांची माहिती वाचायला मिळत आहे. त्यांच्या योगदानाची महत्व विसरता येऊ नये म्हणूनच हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवे असे पवार यांनी सांगितले.