भाविक करमनकर
धानोरा प्रतिनिधी
“सुपोषित भारत सशक्त भारत-साक्षर भारत,या कार्यक्रमांतर्गत सही पोषण भारत रोषण एकात्मिक बाल विकास प्रकल्प धानोरा यांच्यातर्फे आयोजित शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी पोषण अंतर्गत किसान भवन धानोरा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला किलबिलचे प्रमुख,सौ.देवांगना चौधरी नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती धानोरा,समीर कुरेशी माजी नगरसेवक,सौ कल्याणी गुरनुले नगरसेविका धानोरा,प्रमुख अतिथी म्हणून वैभवी मॅडम पालवी प्रोजेक्ट धानोरा,नीलिमा गेडाम बालविकास प्रकल्प अधिकारी धानोरा,अंकुश गांगरेडीवार पिरामल फाउंडेशन धानोरा,बुल्ले सर महिला संरक्षण अधिकारी धानोरा,बारसागडे मॅडम विस्तार अधिकारी धानोरा, वाघाडे मॅडम पर्यवेक्षिका मुरूमगाव,उषाताई चिमुरकर रांगी तसेच धानोरा तालुक्यातील धानोरा-रांगी-मुरूमगाव-पेंढरी-सुरसुंडी-कारवाफा या सर्कल मधील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संचालन सौ वंदना चिमुरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन यामिनी झंजाळ यांनी केले.याप्रसंगी धानोरा तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.