सुधाकर दुधे
सावली प्रतिनिधी
काल रात्री जय बजरंग गणेश मंडळ सावली तर्फे गणेश विसर्जन करण्यात आले. गणेश मूर्ती असोला मेंढ्यांच्या गोसीखुर्द कालव्यात विसर्जन करण्या दरम्यान तीन लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
याबाबत सविस्तर असे की, काल रात्री सावली शहरातून गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली. सावलीत एकुण तीन सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. दोन गणेश मंडळाने सावलीतील गाव तलावात विसर्जन केले, तर जय बजरंग गणेश मंडळाने आसोला मेंढ्यांच्या गोसीखुर्द कालव्यात विसर्जन करण्याचे निश्चित केले. मिरवणूक गोसीखुर्द कालव्यावर सुखरूप पोहचली.
परंतु विसर्जना दरम्यान निकेश हरीभाऊ गुंडावार(३१) राहणार चांदली बुज याचा पाय घसरुन गोसीखुर्दच्या कालव्यात पडला भावाला वाचविण्यासाठी संदीप हरिभाऊ गुंडावार(२७) याने उडी मारली. या दोन भावांना वाचविण्यासाठी सचिन( गुरू) दिवाकर मोहुर्ले राहणार सावली याने गोसीखुर्दच्या कालव्यात उडी मारली. सचिन( गुरू) दिवाकर मोहुर्ले यांचे शव रात्रीचं मिळाले परंतु निकेश हरीभाऊ गुंडावार(३१) आणि संदिप हरीभाऊ गुंडावार(२७) या दोन सख्ख्या भावांचे शव अजून पर्यंत मिळाले नाहीं.
सावली शहरातील पोलीस ठाणेदार आशिष बोरकर हे अधिक तपास करीत आहेत.
गणेश विसर्जनात तीन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातील नागरिक हळहळ करीत आहेत.