ऋषी सहारे
संपादक
कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी, खरमतटोला, देऊळगाव, येथील जंगल परिसरात व गावा लगत हत्तीच्या कळपाने शेत शिवारामध्ये धान पिकाचे अतोनात नुकसान केले असून या प्रकरणाची माहिती शेतकऱ्यांनी आमदार कृष्णा गजबे यांना दिली असता आमदार गजबे यांनी लगेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करुन संबधित अधिकारी यांना पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची सुचना दिली आहे.
या पाहणी दरम्यान ग्रा. पं. अरतत्तोंडीचे सरपंच विजय तुलावी, ग्रा. पं. सचिव राऊत मॅडम, ग्रा.पं. सदस्य राकेश खुणे, अमृत ठलाल, खुशाल दखणे, दिगंबर नाकाडे, संजय मानकर, मन्साराम कुमरे, राऊंड ऑफिसर अलवणे, वनरक्षक मिसार, सह वन विभागाचे अधिकारी कर्मचारी, परिसरातील नागरिक, शेतकरी उपस्थित होते.
वडसा वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र कार्यालय कुरखेडा कडुन गावात हत्तीचा कळप आल्यास दक्षता घेण्या संदर्भात पत्रक वितरीत करुन स्पीकरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती वनविभाचे अधिकारी यांनी आमदार कृष्णा गजबे यांना दिली.