जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे सुधारीत आयोजन.

ऋषी सहारे

संपादक

 

गडचिरोली, : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन स्पर्धा पुस्तीकेत नमुद केल्याप्रमाणे दि. २१ ते २३ सप्टेंबर, २०२३ या कालावधीत करण्यात येणार होते. परंतू उपरोक्त कालावधीत अतिपावसामुळे सदर स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या होत्या.

       त्यामुळे पुनच्छ सुधारीत जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी क्रीडा प्रबोधिनी, गडचिरोली येथे करण्यात येत आहे. तरी तालुक्यातील विजयी संघांनी दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता आपले संघ क्रीडा प्रबोधिनी, गडचिरोली येथे उपस्थित ठेवावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी कळविलेले आहे.