आयुष्यमान भव आरोग्य विषयक विशेष मोहिमेला सुरुवात…

ऋषी सहारे

संपादक

गडचिरोली, : प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेनुसार देशभरात आयुष्मान भव ही महत्वाकांक्षी मोहिम, दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जात आहे. सदर मोहिमेचा उद्देश हा गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा सुविधा पुरविणे व जनजागृती करणे हा आहे.

       या मोहिमेअंतर्गत विविध आरोग्य संबंधित योजनांचा समावेश जन समान्यासाठी करण्यात आलेला आहे. सदर मोहिमेदरम्यान पुढील उपक्रम विशेष मोहिम म्हणून राबवायचे आहेत. आयुष्मान आपल्या दारी ३.०, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहिम, अवयवदान जागृती मोहिम, स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.