अरमान बारसागडे
तालुका प्रतिनिधी चिमूर
चिमूर – चिमूर तालुक्यातील नेरी जवळील सरडपार गावावर शासनाचे दुर्लक्ष होत आहे. हे गाव १५ वर्षा पासून ग्रामपंचायत निवडणुकीपासून वंचित आहे. आजपर्यंत सरडपार हे गाव कोणत्याही ग्रामपंचायत ला जोडलेले नाही, शासनाला कित्तेकदा निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही झालेली नाही, लोकप्रतिनिधी सुद्धा फक्त पाहणी करून परत जातात, या संधर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने अमुल शेंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे सरडपार गावाला ग्रामपंचायत दर्जा देण्याची मागणी केली आहे.
चिमूर तालुक्यापासून १० की.मी. अंतरावर असलेले सरडपार गाव हे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भाग आहे. मात्र २०१५ मध्ये चिमुरला नगरपालिकेचा दर्जा मळाल्याने सोनेगाव ग्रामपंचायतच्या गावांचा समावेश नगर पालिकेमध्ये करण्यात आला. मात्र सरडपार गावाचं समावेश २०१५ पासून कुठेही झालेला नाही. परंतु सरडपार गाव सार्वजनिक प्रशासनाच्या निधीपासून अजूनही वंचितच आहे. या संधर्भात चिमूरचे आमदार मा. किर्तिकुमार भांगडीया, सवर्ग विकास अधिकारी चिमूर, तहसीलदार चिमूर, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. असे असतांनाही २०१५ पासून गावाला ग्रामपंचायत दर्जा मिळत नसल्याने ग्रामस्थांना विविध प्रकारच्या समस्सेला सामोरे जावं लागत आहे.
शासकीय कामाकरीता वेळेवर कागदपत्र मिळत नाही आहेत. ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना, महिलांना अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याने ग्रामस्थ महाराष्ट्र राज्यात आहेत की राज्याच्या बाहेर असा प्रश्न करत आहेत. या संदर्भात ग्रामस्थांतर्फे अमुल शेंडे यांनी पोस्टाने पत्रव्यवहार करून गावाला ग्रामपंचायत दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.