ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, दि. २४ : जिल्हा प्रशासन, गडचिरोली तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगाच्या दारी कल्याणकारी योजनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध शासकीय योजना लाभ व वितरण कार्यक्रम संस्कृती लॉन, आरमोरी रोड, गडचिरोली येथे बुधवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते दिव्यांगाना शासनाच्या विविध योजना व जनकल्याणकारी योजनांची लाभ वितरीत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, मंत्री दर्जा असलेले तथा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, खासदार अशोक नेते, सर्वश्री आमदार डॉ. रामदास आंबटकर, अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, इ. गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. आयुषी सिंह, पोलीस अधिक्षक निलोत्पल आदी तसेच विविध विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहे.
दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल लावले जाणार आहेत. दिव्यांगाचा लाभ घेण्यासाठी नोंदणी तसेच ओळखपत्र आवश्यक असते. त्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांगांच्या दारी माध्यमातून संस्कृती लॉन, आरमोरी रोड, गडचिरोली येथे बुधवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता येत असून दिव्यांगांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.