नीरा नरसिंहपूर दिनांक : 24
प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार ,
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख युवा नेते राजवर्धन पाटील यांच्या हस्ते आज शनिवार ( दि. 23 सप्टेंबर ) रोजी इंदापूर शहरातील गणेश मंडळातील श्रीगणेशाची आज आरती करण्यात आली.भक्तीमय वातावरणात उपस्थित नागरिकांनी यावेळी आरतीमध्ये सहभागी होऊन गणरायाचे पूजन केले.
भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण सर्वजण श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून प्रार्थना करतो.आपल्या संस्कृती आणि परंपरेत श्रीगणेशाची प्रतिष्ठापनेला विशेष महत्त्व आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सामाजिक बांधिलकी जोपासून आपली ही संस्कृती वृद्धिंगत करीत असतात असे मत राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
बाजार मित्र मंडळ बाजारतळ, छत्रपती शिवाजी मित्र मंडळ खडकपुरा ,दत्तनगर गणेश मंडळ दत्तनगर ,सोनाई नगर मित्र मंडळ सोनाई , जय भवानी मित्र मंडळ अंबिकानगर ,नाका बॉईज मित्र मंडळ टेंभुर्णी नाका , जय हनुमान मित्र मंडळ साठेनगर, पांढरे वस्ती मित्र मंडळ माळवाडी आदी मंडळातील श्रीगणेशाची आरती राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद तसेच भाजपा पदाधिकारी, युवा कार्यकर्ते , गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यामध्ये सहभागी झाले होते.