राज्यातील 14 हजार शाळा होणार बंद… — शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..

 

ऋषी सहारे

संपादक

मुंबई दि.२३ – राज्यातील शाळांसंदर्भात काल शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने हालचाल सुरू केली आहे. 

          तसेच याबाबतचे प्रस्ताव 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

        राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात 20 पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या 14 हजार 783 शाळा बंद होण्याची शक्यता आहे. 

        विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळतील याशिवाय खेळ, संगीत, कला यांच्यासाठी शिक्षक मिळू शकतील या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.