मोबाईल टॉवर वरून पडून युवक गंभीर जखमी…

 

अरमान बारसागडे

तालुका प्रतिनिधी चिमूर

 

चिमूर – नेरी येथील रहाटे चाळीच्या मागे असलेल्या मोबाईल टॉवर वर चढलेला युवक खाली पडून गंभीर जखमी झाला. नेरी येथील रामकृष्ण तुकाराम ढोणे (२२) हा युवक दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास टॉवर वर असलेल्या मधमास्याचा पोळा काढण्यासाठी चढला, मधमास्यांनी त्याच्यावर हमला करताच तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ नेरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे हलविण्यात आले. तिथूनसुद्धा त्याला चंद्रपूरला रेफर केल्याची माहिती आहे .