चिमूर शहरात मतिमंद युवतीवर अत्याचाराचा प्रयत्न…

 

अरमान बरसागडे

तालुका प्रतिनिधी

 

        चिमूर – शहरातील एका विवाहित युवकाने घराजवळच राहणाऱ्या एका मतिमंद युवतीवर अत्त्याचार केल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली. परंतु मतिमंद युवतीने याची तक्रार पोलिसांत केली नव्हती. मात्र सोमवारी परत विवाहित युवकाने मतिमंद मुलीवर आत्त्याचाराचा प्रयत्न केला, हा प्रकार मुलीच्या आईच्या निदर्शनास येताच तिने चिमूर पोलिस ठाणे गाठून तक्रार केली.

         तक्रारीवरून विवाहित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील विठ्ठल वाढई (३०) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने महिनाभरापूर्वी मतिमंद मुलीवर अत्याचार केला होता. परंतु मुलीने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. सोमवारी परत आरोपीने मतिमंद तरुणीला घरी बोलावून अत्याचाराचा प्रयत्न केला.

            तरुणीने हा प्रकार आईला सांगितला तिने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपीवर भांदवी कलम ३७६ (२) (एल) ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात दाखल करून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी राकेश जाधव, निलेश चवरे यांच्या मार्गदर्शनात केला.