हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प ,भामरागड तसेच मार्कंडा देवस्थान इथे एकदिवसीय सहलीचे आयोजन… — प्रकाश आमटे कुटुंबियांसोबत घेतली भेट… — मानव सेवा मंडळ,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व गुरुकुल आयटीआयचा अभिनव उपक्रम…

चेतक हत्तिमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

लाखनी:-

          लाखनी बसस्थानकावर ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने तयार केलेल्या ‘नेचर पार्क’वर सकाळी- सायंकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकानी मानव सेवा मंडळाची स्थापना दीड वर्षापूर्वी केली असून याद्वारे दररोज सकाळच्या प्रहरी योग, व्यायाम,नृत्यव्यायाम ,हास्ययोग असे विविध उपक्रम तसेच पुन्हा सायंकाळी ‘नेचर पार्क’वर एकत्र येत विविध विषयावर गप्पा करून आयुष्याच्या मावळतीचे क्षण आनंदात घालविले जात असतात.अशा या मानव सेवा मंडळ,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व गुरुकुल आयटीआय तर्फे अनेकदा सहलीचे व क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते.

          अशीच एक दिवसीय संस्मरणीय सहलीचे आयोजन गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे करण्यात येऊन बाबा आमटे,प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पास 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विस्तृतपणे भेट देण्यात आली.यावेळी स्वतः प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे त्यांचे पुत्र डॉ.दिंगत आमटे यांनी मानव सेवा मंडळाच्या सहलीतील 18 सदस्यांना संपुर्ण वेळ देत भेट घेतली व संपूर्ण लोकबिरादरी प्रकल्पाची ओळख करून दिली. त्याचप्रमाणे मानव सेवा मंडळ व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व गुरुकुल आयटीआय करीत असलेले विविध समाजसेवी आणि निसर्ग, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी करीत असलेल्या उपक्रमाची माहिती जाणून घेऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.यावेळी लोकबिरादरी प्रकल्पातील अनाथ जखमी प्राण्यांच्या सुश्रुषेकरिता उभारलेले बिबट,नीलगाय,सालींदर, अस्वल,हरिणी, राज्य प्राणी शेकरु,चौसिंगा इत्यादी प्राणी असलेले वन्यप्राणी संग्रहालय , निःशुल्क चालवित असलेले हॉस्पिटल,शाळा,तसेच बांबू हस्तकला व इतर समाजसेवी प्रकल्पास भेट दिली. यावेळी सर्व मानव सेवा मंडळाच्या सदस्यांनी ‘आमटे कुटुंबीयांचा विजय असो’असा उद्घोष त्यांच्या उपस्थितीत केला तेव्हा डॉ .प्रकाश आमटे व मंदा आमटे भारावुन गेले.यानंतर लगेच भामरागड येथे इंद्रावती ,पर्लकोटा व पामुलगौतमी ह्या तीन नदीच्या संगमस्थळी भेट देण्यात आली. त्याचबरोबर जाता जाता मार्कन्डा देवस्थान चामोर्शीला सुद्धा भेट देण्यात आली.परत येताना ‘ग्लोरी ऑफ आलापल्ली’ चे दर्शन आलापल्ली जवळ घेण्यात आले. हेमलकसा येथे ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे सदस्य असलेले व लोकबिरादरी प्रकल्पातील शाळेत कार्यरत शिक्षक खुशाल कापगते, सुंदरनगर येथील महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य संजय भांडारकर व गडचिरोली इथे गोंडवाना सैनिक शाळेत कार्यरत सुभेदार ऋषी वंजारी यांनी मानव सेवा मंडळाच्या तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या सर्व सदस्यांकरिता अल्पोपहार तसेच चहापाण्याची स्वखुशीने व्यवस्था करून सर्व मानव सेवीच्या प्रवासाचा शीण घालविला.त्याबद्दल मंडळाने त्यांचे आभार व्यक्त केले.

          एक दिवसीय सहलीचे आयोजनाकरिता ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व नेफडो विभागीय वन्यजीव समिती नागपूर व जि.भंडाराचे संघटक प्रा.अशोक गायधने,अध्यक्ष अशोक वैद्य,शिवलाल निखाडे,गुरुकुल आयटीआयचे प्राचार्य खुशालचंद मेशराम,मानव सेवा मंडळाचे ऍड. शफी लद्धानी, रमेश गभने,रामकृष्ण गिर्हेपुंजे,डॉ. दिलीप अंबादे,गोपाळ बोरकर,डॉ.पंढरीनाथ इलमकर,भैयाज्जी बावनकुळे,मधुकर गायधनी,सुनिल खेडीकर,दुलीचंद बोरकर,विद्यमान जाधव, सुभेदार ऋषि वंजारी,डॉ. हितेश वंजारी,अशोक धरमसारे व ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे व डॉ उदय राजहंस यांनी एक दिवसीय हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाच्या सहलीसाठी सहभाग नोंदवून उत्तम सहकार्य केले.