अमान क़ुरैशी
जिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज़ भारत
भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. या व्यवसायात कित्येक शेतकरी गुंतलेले आहेत. पिकावर रोगांचा आणि किटकांचा प्रादुर्भाव असला की वार्षिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत असते . पण सगळेच कीटक शेतीसाठी हानिकारक असतात असे मुळीच नाही .काही कीटक शेतीसाठी उपयुक्त असतात ज्याना मित्र किटके म्हणून ओळखले जाते आणि ही किटके शेतीवरील रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यात मदत करत असतात .
कित्येक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले असेल तरी पण सामान्य शेतकऱ्याना याबाबत माहिती नसते . याबाबत जागरुकत निर्माण करण्याकरिता कृषि विद्यान केंद्र सिंदेवाही येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम ( rawe ) अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या कृषि महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थ्यानी डॉ . नागदेवते सर , डॉ सिडांम सर , डॉ लोखंडे मॅम , डॉ वेलादी मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली पळसगांव जाट येथील शेतकऱ्याना मित्र कीटक आणि शत्रू कीटक यांची ओळख करवून त्यांचे महत्व समजावून सांगितले व मित्र किटकांच्या शेतीतील वापराबद्दल मार्गदर्शन केले .
उपयुक्त आणि गैर-उपयोगी कीटक कीटकांची ओळख ही शेती आणि परिसंस्थेतील कीटक व्यवस्थापनाची एक महत्त्वाची बाब आहे. आपल्या जगामध्ये कीटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, काही प्रजाती मानवांना आणि पर्यावरणाला लाभदायक ठरतात, तर काही पिके, आरोग्य आणि परिसंस्था यांना धोका निर्माण करतात. प्रभावी कीटक नियंत्रण आणि संवर्धन प्रयत्नांसाठी या दोन श्रेणींमध्ये फरक करणे आवश्यक आहे. चेतन अलोने , मिलिंद भडके ,दिशांक डोकरीमारे ,शुभम काळसर्पे या विद्यार्थ्यानी या प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते . या कार्यक्रमात पळसगाव येथील शेतकऱ्यांनी सकारात्मक सहभाग दर्शविला होता .