प्रितम जनबंधु
संपादक
आरमोरी :- राज्यात प्रतिबंधित मादक पदार्थ विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आली असली तरी गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत प्रतिबंधित तंबाखू तस्करी केला जात आहे. आरमोरी शहरात व तालुक्यातील गावागावात इगल, मजा, इत्यादीं घातक सुगंधित तंबाकुची तस्करी बेधडक व खुलेआम होत असताना दिसुन येत आहे. सदर विघातक माल पुरवठा करणारा तस्कर आरमोरीत बस्तान ठोकून तस्करीची सूत्रे हलवित असल्याचे जनमानसात बोलल्या जात आहे. संबधीत स्थानीक प्रशासन मात्र बघ्याचीच भूमिका वटवतोय की काय असा यक्षप्रश्न उपस्थित होत आहे.
वडसा देसाईगंज पोलीसांकडून दोन दिवसांपूर्वीच कारवाई करुन लाखोंचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करुन मोठी कारवाई केली असल्याचे दिसून येत आहे. मग आरमोरी प्रशासनाने चुप्पी का साधली आहे. यांचेकडून कारवाई का केली जात नाही. अशी असंख्य प्रश्न जनसामान्यांच्या स्मृतीपटलावर प्रतिबंबीत होतांना दिसुन येत आहेत.
उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा उद्दांत हेतून जिल्ह्यात अथक प्रयत्नांती २ ऑक्टोंबर १९९२ पासून राज्य शासनाला मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी फेरण्यास भाग पाडून दारूबंदी लागू करण्यात आली. त्याच धर्तीवर सुगंधित तंबाखूच्या सेवनाने दरवर्षी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने लाखो लोक मृतमुखी पडत असल्याची सबब पुढे करून २०१२ पासून सुगंधित तंबाखू व तत्सम मादक पदार्थाच्या वाहतूक व विक्रीवर बंदी घालण्यात आली. मात्र, जिल्ह्यात लगतच्या राज्यातून बेधडक वाहतूक करून प्रतिबंधित तंबाखूची सर्रास विक्री केल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव दिसुन येत आहे.
जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखू तस्करीनेही हैदोस घालण्यास प्रारंभ केला आहे. सुगंधित व बनावट तंबाखू तस्कर दर दिवशी चारचाकी वाहनाने लाखोंचा प्रतिबंधित तंबाखू बेधडकपणे आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरात विक्री करण्यास यशस्वी होत आहे. त्यामुळे घराघरात मावा, खर्रा खाणार्याची संख्या दिवसागणिक वाढत असून लहानथोर, युवावर्ग व्यसनाधीन बनत चालला आहे. यामुळे आरोग्याच्या समस्यां जनसामान्य लोकांना भेडसावत आहेत. चौकाचौकातील पानटपरीवर सिगारेटचा धुरच धुर बघायला मिळत आहे. यावर प्रतिबंध घालणारा संबंधित विभाग मात्र निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. मग यावर कारवाई करणार कोण? असा यक्षप्रश्न जनमानसाच्या स्मृतीपटलावर उपस्थित होत आहे.
मादक पदार्थाच्या सेवनाने मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असल्याने जनमानसाच्या आरोग्यावर विपरित परिणाम जानवु लागले आहेत. नकली सुगंधित तंबाकु सेवनाने आरोग्याचे धोके वाढले आहेत. एकंदरीत सर्व बाबिचा सारासार विचार करुन शिवाय आरोग्यबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यावर काय करवाई करतात. याकडे सद्या सर्वांचे लक्ष लागल्याचे दिसून येत असून प्रतीबंधित तंबाखू तस्करास जेरबंद करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.