
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी परशिवणी
पारशिवनी:- तालुक्यातील पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार दिलीप टेकाम, पोलीस अंमलदार राकेश बंधाटे हे रात्रि कालिन कर्तव्यावर असताना पेट्रोलिंग ड्युटी दरम्यान डायल 112 वर कॉल आला व त्याना म्हटले की करंभाड रोड वरील कार क्रमांक गाडी क्रमांक MH 36 5765 ही करंभाड रोडचे पुलाखाली पलटी झाल्याची माहिती प्राप्त होताच लगेच पोलीस मित्र रंजीत ठाकूर यांनी सहकार्य च्या मदतीने तात्काळ मदत पुरवून कार मध्ये असलेले भंडारा वरून येणारे
1) प्रधान दिपकराव उपगडे वय 30 वर्षे
2)हरिश वासुदेव उदास वय 38 वर्षे
3)सौ स्वाती हरिश उबरन 28 वर्षे
4) प्रियंका प्रशान उपगडे वय 28 वर्षे
5)कु. कार्तिकी हरिश उदास वय 08 वर्षे
6) कु. श्रीवल्लभ प्रशान उपगडे वय 03 वर्ष
व 7) 01 महिन्याचे लहान बाळ सर्व राहणार भंडारा याना सुखरूप बाहेर काढले .