निरा नरसिंहपुर प्रतिनिधी :-
बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील बळीराजा कष्टकरी शेतकरी पोपट बाबुराव सुतार,दादा आलम शेख या दोन शेतकऱ्याचा प्रत्येकी एक एकर शेतामधील इलेक्ट्रिक केबलच्या शॉर्टसर्किटमुळे उस जळून खाक झाला असल्याची घटना घडली.
दुष्काळ परिस्थितीत सदर दोन्ही शेतकऱ्यांचे अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.
शेती पंपापर्यंत विद्युत तारेचे कनेक्शन नसल्यामुळे उस जाळाल्याचा प्रकार शॉर्टसर्किटमुळे घडलेला आहे.तसेच इलेक्ट्रिक केबल द्वारे विद्युत पुरवठा शेती पंपाला करावा लागतो.
***
डिमांड भरूनही विद्युत कनेक्शनची पुर्तता नाही…
बाळासाहेब बाबुराव सुतार यांची 5/ एचपीची व पोपट बाबुराव सुतार यांची 3/ एचपीची,या शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारचे डिमांड भरून सुद्धा त्या शेतकऱ्याच्या विहिरीपर्यंत/ विद्युत पुरवठा नाही.
म्हणूनच केबलच्या साह्याने कनेक्शन घेऊन शेतीच्या पाण्यासाठी विद्युत पंप चालवावा लागत आहे.
एकीकडे दुष्काळाचे संकट तर दुसऱ्या बाजूने महावितरण कंपनीच्या गचाळ कारभारामुळे हा तिसऱ्यांदा प्रकार घडलेला आहे.
तरीसुद्धा शेतकऱ्याला संकटाला सामोरे जावे लागत आहे.10 ते 12 वर्षापूर्वी इलेक्ट्रिक मोटारीचे डिमांड भरून सुद्धा शेतकऱ्याच्या शेतातील विहिरी पर्यंत विद्युत पुरवठ्यासाठी तारा व इलेक्ट्रिक खांब नसल्याने हा प्रकार घडलेला आहे.
अंतर जास्त आसल्याने केबल गरम होऊन असे प्रकार घडत आहेत.बाळासाहेब बाबुराव सुतार यांच्या नावे 2 पोलची मंजुरी आहे. तसेच पोपट बाबुराव सुतार यांच्या नावे 1 पोलची मंजुरी आहे.
यासाठी लागणाऱ्या तारा व विद्युत खांब तडजोड करून लवकरच या दोन शेतकऱ्यांसाठी द्यावेत हीच महत्त्वाची शेतकऱ्याची मागणी आहे.
शेतीपंपासाठी खांब व तारा दिल्यास इथून पुढेही असा होणारा अनर्थ घडणार नाही.
***
चौंकट :-
शेतीपंपाचे डिमांड एचपी प्रमाणे भरून सुद्धा शेती पंपापर्यंत विद्युत पुरवठा नाही,, खांब /तारा मंजुर आसुनही विद्युत पुरवठा नाही.
***
चौंकट:-
शेतातील विद्युत पंप चालवण्यासाठी 400 ते 500 फूट केबल टाकून शेतीच्या पाण्यासाठी करावी लागते कसरत.
****
आर्थिक नुकसान भरपाई मिळावी…
दोन शेतकऱ्याचा संपूर्ण जळालेल्या उसाचा पंचनामा करून शासकीय नियमानुसार त्वरित नुकसान भरपाई मिळावी…
****
फोटो
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील पोपट सुतार, व दादा शेख यांच्या शेतातील जळालेला ऊस घटनाक्रम फोटो सह बातमीत फ्रंटवर.