डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
गडचिरोली काल दिनांक:- ०९/०४/२०२३ रोजी पोलीस स्टेशन, आष्टी येथे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर मौजा चंद्रपूर ते आष्टी, आलापल्ली रोडने सिल्व्हर रंगाची कार क्र. एम एच ०२ बी पी ३९८३ या कारने देशी/विदेशी दारुची वाहतुक करणार असल्याची माहीती मिळाली. त्यावरुन पोस्टे आष्टी येथील अधिकारी व अंमलदार हे चंद्रपूर ते आष्टी रोडवर रात्रीदरम्यान पंचासह खाजगी वाहनाने रवाना झाले. त्यानंतर सदर रोडवरील मार्कंडा कनसोबा फाट्यालगत सदर कारला थांबवून चेक केले असता, कारमध्ये १) ५०० मी.ली. मापाचे हेवर्ड्स ५००० कंपनीचे बियर टिन अंदाजे किंमत ५४,००० /- रु. २) २ लिटर क्षमतेचे रॉल स्टॅग कंपनीची विदेशी दारु अंदाजे किंमत ४५,०००/-रु. ” ३) ९० मी.ली. मापाचे रॉकेट संत्रा देशी दारु अंदाजे किंमत ४०,०००/- रु. ४) ७५० मी.ली. मापाचे इम्पेरियल ब्ल्यू कंपनीची विदेशी दारु अंदाजे किंमत २८,८०० /- रु. ५) ३७५ मी.ली. मापाचे इम्पेरियल ब्ल्यू कंपनीची विदेशी दारु अंदाजे किंमत १४,४०० /- रु. व ६) १८० मी.ली. मापाच्या रॉयल स्टॅग कंपनीची विदेशी दारु अंदाजे किंमत १४,४००/- रुपये अशी एकुण १,९६,६०० रुपयाची दारू तसेच सदर देशी/विदेशी दारु नेण्यासाठी वारण्यात आलेली सिल्व्हर रंगाची फियाट कंपनीची चार चाकी वाहन क्र. एम एच ०२ बी पी ३९८३ ही अंदाजे किंमत ५,००,०००/- रुपये असा एकुण ६,९६,६००/- रुपयांचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त केलेला आहे.
सदरची वाहन ही कोमल रतन निमगडे, वय २८ वर्षे, धंदा मजुरी, रा. आंबेडकर नगर, बायपास रोड, बाबूपेठ, चंद्रपूर जि. चंद्रपूर याची असून संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे आष्टी येथे पोस्टे अप. क्र. ७१ /२०२३ कलम ६५ (अ) म.दा.का. अन्वये आरोपी नामे कोमल रतन निमगडे यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी यास अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा. व अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनात पोस्टे आष्टी, येथील पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि अजयकुमार राठोड, पोउपनि गणेश जंगले, नापोअं/ ३६१३ ज्ञानेश्वर मस्के, पोअं/ ३४१२ तोडासे, पोअं/ ५६६१ रायसिडाम, पोअं/ ११५७ तीमाडे, पोअं/ ४४९९ मेश्राम यांनी केलेली आहे.