नगराध्यक्षा रोजाताई करपेत यांना न्याय देण्यात यावी!! — ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनची पोलीस निरीक्षक कडे मागणी..!!

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत यांनी मानहानी प्रकरणात आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल गैरअर्जदार अहेरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री.दिनकर खोत यांच्यावार अट्रासिटी नुसार कारवाई करा. आदिवासी महिला रोजा करपेत यांचेकडून संघटनेस प्राप्त निवेदनुसार व संघटनेचे प्रत्यक्ष त्यांची व इतर पदाधिकारिंशी भेट देऊन साधलेल्या संवादानुसार गैरअर्जदार श्री. दिनकर खोत हे 05/04/2023 रोजी नगराध्यक्षांच्या दालनात प्रवेश करून रागाच्या भरात पातळी सोडून उन्मत्तपणे व उर्मटपणे म्हणाले की तुम्ही आदिवासी लोकं सुधरत नाही तुम्ही आदिवासी आदिवासीच आहात तुम्ही कितीही मोठ्या पदावर गेले तरी नालायक व बेअक्कल आहात तुमच्यासाठी शासनाने करोड रुपये खर्च केले तरी तुम्ही सुधरत नाही.या वक्ताव्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. नगराध्यक्षा कु. रोजा करपेत हा उच्च विद्याविभुषित महिला असून नगरपंचायतीच्या प्रथम नागरिक अर्थात नगराध्यक्षा पदावर कार्यरत आहेत. त्यांचाशी वागण्या – बोलण्याचा एक साधा सभ्यपणा व शिष्टचार एका वरिष्ठ शासकीय कर्मचाऱ्याला असू नये या सारखी दुसरी शोकांतिका नसून नगराध्यक्षा एक उच्च विद्याविभुषित आदिवासी महिला आहेत.आदिवासी समुदायाबद्दल त्यांनी जे मानहानीजनक जे वक्तव्य केले. त्यामुळे आदिवासी समुदायाच्या भावना दुखावलेल्या आहे. तरी गैरअर्जदार श्री.दिनकर खोत यांची योग्य चौकशी करून त्यांचेवार अट्रासिटी ऑक्टनुसार कडक कठोरात कठोर कारवाई करून आदिवासी माहिल अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा कू. रोजा करपेत यांना न्याय मिळवून द्यावा.

       अशी निवेदन ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन उपविभागीय शाखा अहेरी कडुन जिल्हा उपाध्यक्ष प्रो.रमेश हलामी,सल्लागार श्री.मधुकर सड़मेक,सल्लागार श्री.अरुण धूर्वे,नामदेवराव आत्राम,विभागीय अध्यक्ष श्री.महेश मडावी,कार्याध्यक्ष श्री.यादव मडावी,तालुका अध्यक्ष श्री.बापू तोरैम,सल्लागार श्री.बिरजु गेडाम,कोषाध्यक्ष श्री.सुंदरदास सड़मेक,पी.बी.सिडाम,आदिनी निवेदन दिले..!!